पालीत अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्ष आणि नागरीकांनी वाहिली श्रद्धांजली

अमित गवळे 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पाली - तालुका भाजपच्या वतीने पालीत सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. येथील गुजराती समाज हॉलमध्ये आयोजित शोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व भावी पिढीला प्रेरणादायी राहील असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी हे एक अलौकिक व प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. धुरंधर राजकारणी, गेली सात दशके आपल्या कर्तृत्वाने देशाच्या राजकारणात अढळ स्थान निर्माण करणारे तथा राजकारणातील अजातशत्रु म्हणून ओळख असलेल्या कवीमनाच्या नेतृत्वाचा अस्त झाला असे सांगून विष्णू पाटील यांनी आदरांजली वाहिली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत यांनी भारतीय लोकशाहीला समृध्द करणारे व लोकशाही संकेताचे मापदंड निर्माण करणारे व्यक्तीमत्व हरपले असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. यावेळी चंद्रकांत (दादा) घोसाळकर, विजय धारीया, आलाप मेहता आदिंसह उपस्थीत सर्वपक्षिय मान्यवरांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्व व विचारसरणीवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमास भाजप नेते विष्णू पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस सुनिल दांडेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, चंद्रकांत घोसाळकर यांच्यासह राष्ट्रवादी पेण सुधागड मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, सुधागड तालुका कॉग्रेस अध्यक्ष अनिरुद्द कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, माजी सभापती सुरेश ठोंबरे, भाजप सुधागड तालुका माजी अध्यक्ष राजेंद्र गांधी, भाजप सरचिटणीस आलाप मेहता, शिवसेना सुधागड उपतालुकाप्रमुख सचिन जवके, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद खोडागळे, शिवसेना कार्यकर्ते अनुपम कुलकर्णी, विद्देश आचार्य, मनसेचे संजय घोसाळकर, श्रीपाद वैद्य, हिराकांत भगत, माजी सरपंच अशोक मेहता, ज्येष्ट कार्यकर्ते विजय धारीया, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अरिफ मनियार, जितेंद्र गद्रे, भाई मोरे, व्यापारी असो. अध्यक्ष अशोक ओसवाल, शिदोरे गुरुजी, विश्वहिंदू परिषदेचे किशोर खरिवले, आर.एस.एस.चे सौरभ मराठे, प्रकाश कारखानिस, उत्तम ओसवाल, सुलतान बेणसेकर, पप्पू परबळकर, इसाक पानसरे, वासुदेव मराठे, अरुण खोडागळे, प्रदिप तिवारी, मंदार आपटे, आदिंसह नागरीक व सर्वपक्षिय नेते कार्यकर्ते उपस्तीत होते.

Web Title: Pillit Atal Bihari Vajpayee was honored by the All-Party and Citizens