भिऱ्याचा पारा चढला

अमित गवळे 
सोमवार, 26 मार्च 2018

पाली - सह्याद्रिच्या कुशित वसलल्या माणगाव तालुक्यातील भिरा गाव व आसपासच्या परिसराचे कमाल तापमान रविवारी (ता.25) व सोमवारी (ता.26) 42 अंश सेल्सियसवर पोचले होते. त्यामुळे उन्हापासून परिसरातील ग्रामस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना पाटणूस ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.  

पाली - सह्याद्रिच्या कुशित वसलल्या माणगाव तालुक्यातील भिरा गाव व आसपासच्या परिसराचे कमाल तापमान रविवारी (ता.25) व सोमवारी (ता.26) 42 अंश सेल्सियसवर पोचले होते. त्यामुळे उन्हापासून परिसरातील ग्रामस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना पाटणूस ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.  

या दोन दिवस येथील किमान तापमान अनुक्रमे 20 व 25 अंश सेल्सिअस होते. अचानक वाढलेल्या तापमानामुळे सर्वच लोक हैराण झाले आहेत. दुर्गम आणि सह्याद्रिच्या कुशित असलेले हे गाव टाटा पावर हाऊसमुळे सगळ्यांच्या परिचयाचे. काही अंतरावरच विळा-भागाड एमआयडीसी सुद्धा आहे. डोंगर, दर्या व निसर्गाने नटलेले आणि सभोवताली उन्नैयी (भिरा) धरण, कुंडलिका नदी आणि कालव्याच्या मुबलक पाण्याने वेढलेला हा परिसर आहे. अशी गारव्यासाठी पोषक परिस्थीती असतांना देखील गावाचा पारा मात्र चढलेला असतो.  

भिरा गाव व बाजुच्या परिसरातील तापमान मागील वर्षी मार्च महिन्यात बुधवारी (ता.२९) ४६.६ अंशावर पोहचले होते. जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान या गावाचे होते. त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष वेधले गेले होते. सकाळने देखील यासर्व परिस्थितीचा योग्य आढावा घेतला होता. गेल्या काही दिवसात या भागाचे तापमान खुप वाढले आहे. यासंदर्भात गावकर्यांना सावधानता बाळगण्याची व योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

आरोग्याची खबरदारी कशी घ्यावी यासाठी गावात सुचना फलक देखील बसविण्यात आले आहेत. कोणतीही गंभीर परिस्थिती ओढावणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीकडून घेतली जात आहे. 
विजय म्हामुणकर, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पाटणूस

तीव्र उन्हामुळे शाळा सकाळी ठेवली आहे. विदयार्थांना उन्हात कमी फिरण्याच्या, टोपी घालुन फिरावे, जास्तीत जास्त पाणी व द्रव पदार्थ घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच उन्हाचा तडाख्यामुळे मुलांना संध्याकाळी खेळण्यास सांगितले आहे. शाळेकडून योग्यती खबरदारी घेतली गेली आहे. 
राम मुंढे, शिक्षक, कुंडलिका विदयालय, पाटणूस

Web Title: plai bhira konkan summer temperature