रायगड - प्लास्टिक मुक्तीसाठी सुधागड प्रतिष्ठान व रोटरी क्लबचा पुढाकार

अमित गवळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

पाली (रायगड) : पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. योग्य पर्याय उपलब्ध करुन दिल्या शिवाय शंभर टक्के प्लास्टिक बंदी शक्य नाही. म्हणून सुधागड प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीच्या सहकार्याने मोफत कापडी पिशव्या वाटप करण्याचा पर्याय दिला आहे.

ठाण्यातील हॉटेल सत्कार रेसीडेंसी येथे रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. बी. एम. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नर सुहास आपटे, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सेक्रेटरी प्राची वैद्य यांच्या उपस्थितीत नुकताच कापडी पिशवी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

कापडी पिशव्यांचे विनामूल्य वाटप हे कोकण पदवीधर संस्था आणि सुधागड प्रतिष्ठान ठाणे यांचे सहकार्याने विविध कार्यक्रमांतून करण्यात येणार असल्याचे सदाशिव लखिमळे यांनी सांगितले. त्याचा औपचारिक शुभारंभ सत्कार रेसीडेन्सी येथे पार पडलेल्या बैठकीत झााला असला तरी प्रत्यक्ष कापडी पिशच्यांचे वाटप या पूर्वीच सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. अागामी काळात दहा हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले जाणार अाहे असे ते म्हणाले.

प्लास्टिकच्या पिशव्यांत टाकेलेले अंन्न पदार्थ प्लास्टिकसह खाऊन मुकी जनावरे मृत्यूमुखी पडण्याच्या घटनात वाढ झाली आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे प्रदुषण होऊन गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच सांडपाणी व्यवस्थेच्या निच-याची समस्या देखिल गंभीर होताना दिसते. प्लास्टिक पिशवी बंदीमुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊन जनावरांचे प्राण देखील वाचणार अाहेत. प्लास्टिक बंदी हि केवळ कागदोपत्री घोषणा होऊन चालणार नाही तर याबरोबर त्या कायद्याची कडक अंलबजावणी होणे गरजेचे आहे.शिवाय प्लास्टिक बंदीला योग्य व सोपस्कर पर्याय निर्माण होऊन नागरीकांत जनजागृती झाली पाहिजे. प्लास्टिक पिशवीला सर्वोत्तम पर्याय म्हणून कापडी पिशवीचा पर्याय समोर आला अाहे. प्लास्टिक मुक्ती करीता सुधागड प्रतिष्ठानने राबविलेली चळवळ खुप उपयुक्त ठरणारी आहे. यासाठी सुधागड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्वास गोफण यांचे सहकार्य लाभणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधागड प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राजेश बामणे, संदीप जाधव, प्रविण बामणे,प्रदीप धनावडे, सिताराम थोरवे, दत्ता यादव, सुहास यादव, संतोष हुले आदींचे सहाय्य मिळाले.

Web Title: plastic free raigad initiative by sudhagad prathishthan and rotary club