खेळाडूंना वाढीव ग्रेस गुण 

तुषार सावंत
शुक्रवार, 24 मार्च 2017

कणकवली - दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळणार आहेत; मात्र अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात सादर करावे लागणार आहेत. 

राज्यशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार करण्यासाठी शालेय स्तरावर मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करून तसे धोरण निश्‍चित केले आहे. यानुसार 21 एप्रिल 2015 ला वाढीव गुण देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता 7 मार्च 2017 च्या सुधारित आदेशानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा प्रावीण्य मिळविलेल्या तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त खेळाडू विद्यार्थ्याला 25 क्रीडा गुण दिले जाणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे 3 क्रमांक प्राप्त खेळाडू विद्यार्थ्याला 20 सवलतीचे गुण मिळणार आहेत. याचबरोबर क्रीडा विभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या शालेयस्तरावरील ग्रामीण तसेच महिला सहभागी असलेल्या इतर राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे 15 गुण दिले जाणार आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अटीला अधीन राहून क्रीडा सवलतीचे गुण दिले जाणार आहेत. 

Web Title: The players heightened Grace Marks