पाटगाव येथे रंगली चिखलणी, नांगरणी स्पर्धा

संदेश सप्रे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

देवरूख - पाटगाव येथे प्रथमच सामुदायिक चिखलणी व नांगरणी स्पर्धा घेण्यात आली. जय सांबा, पाटगाव ग्रामस्थ मंडळ व देवरुख येथील भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

देवरूख - पाटगाव येथे प्रथमच सामुदायिक चिखलणी व नांगरणी स्पर्धा घेण्यात आली. जय सांबा, पाटगाव ग्रामस्थ मंडळ व देवरुख येथील भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

घाटी बैलजोडी प्रकारात देवळे येथील दिलीप शिर्के यांच्या बैलजोडीने १८ सेकंद ९७ पॉर्इंटमध्ये निश्चित केलेले अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला. विहार कदम (आरवली) यांच्या बैलजोडीने द्वितीय तर पंकज दळवी (शिंदेआंबेरी) यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला.

गावठी बैलजोडी प्रकारात करंबेळे येथील सचिन धावडे यांच्या बैलजोडीने १९ सेकंद १५ पॉर्इंटमध्ये निश्चित केलेले अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला. शंकर डोंगरे (साडवली) यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक तर राजाराम चव्हाण (कडवई) यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला.

गावठी बैलजोडी प्रकारामध्ये साडवलीचे शंकर डोंगरे व करंबेळेचे सचिन धावडे यांच्या बैलजोडीने १९.१५ सेकंदात अंतर पार केले.. दोन्ही जोड्या एकाच वेळेत आल्यामुळे प्रथम क्रमांकासाठी टॉस उडविण्यात आला. तो करंबेळे यांनी जिंकला.

घाटीमध्ये आरवली येथील विहार कदम व शिंदे आंबेरी येथील पंकज दळवी यांच्या बैलजोडीनेही समान वेळेत अंतर पार केल्याने व्दितीय क्रमांकासाठी टॉस करण्यात आला. यामध्ये विहार कदम हे जिंकले.

Web Title: Plowing in Mud competition in Patgaon