पोलादपूर तालुका हागणदारीमुक्तीच्या वाटेवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

पोलादपूर - लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मनावर घेतले की कोणतेही मोठे काम सहज पूर्ण होते, याची प्रचिती पोलादपूरमध्ये येत आहे. सरपंच, सामाजिक संस्था आणि ग्रामसेवकांनी हातात हात घालून हागणदारीमुक्ती योजना प्रभावीपणे राबवत शौचालये बांधली आहेत. व्यापक जनजागृती केल्याचा सुपरिणामही दिसून येत आहे. 

पोलादपूर - लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मनावर घेतले की कोणतेही मोठे काम सहज पूर्ण होते, याची प्रचिती पोलादपूरमध्ये येत आहे. सरपंच, सामाजिक संस्था आणि ग्रामसेवकांनी हातात हात घालून हागणदारीमुक्ती योजना प्रभावीपणे राबवत शौचालये बांधली आहेत. व्यापक जनजागृती केल्याचा सुपरिणामही दिसून येत आहे. 

पोलादपूर तालुक्‍यामध्ये 42 ग्रामपंचायती, 86 गावे व 212 वाड्या आहेत. त्या ठिकाणी 10 हजार 71 कुटुंबे राहतात. यापैकी नऊ हजार 150 कुटुंबांनी शौचालये बांधली आहेत. स्वदेश सामाजिक संस्था 312 शौचालये बांधून देणार आहे. ग्रामस्थ वैयक्तिकरीत्या 413 शौचालये बांधणार आहेत. तालुक्‍याच्या विविध भागातील 196 घरे कायमस्वरूपी बंद आहेत. पोलादपूर तालुक्‍यामध्ये यापूर्वी अपेक्षित प्रमाणात वैयक्तिक शौचालयांचे काम झाले नव्हते. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सक्रियतेमुळे आता हा तालुका स्वच्छतेच्या बाबतीत आघाडीवर आहे. 

ग्रामीण भागात अस्वच्छतेमुळे अनेक लोक आजारी पडतात, प्रसंगी दगावतात. कष्टाने कमावलेली पुंजी उपचारांवर खर्ची पडते. हे चित्र बदलण्याचा निर्धार हागणदारीमुक्ती योजनेंतर्गत केला आहे. देश एकीकडे महासत्तेकडे वाटचाल करीत असताना गावातील महिला उघड्यावर शौचास जाणे ही वाईट बाब असल्याची जाणीव गावकऱ्यांमध्ये होत आहे. महासत्तेसोबतच स्वच्छ व बलशाही समाज घडविण्याचे काम सुरू आहे, असे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी "सकाळ'ला सांगितले. पोलादपूर तालुक्‍याचा आदर्श अन्य तालुक्‍यांनी घेतल्यास संपूर्ण जिल्हा नियोजित लक्ष्याआधीच हागणदारीमुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

2012 मधील सर्वेक्षणात ज्या कुटुंबाकडे शौचालये आढळली नाहीत, त्यांना 12 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. 

काय घडले? 
-शौचालय बांधण्याचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांना सूचना केल्या. 
-ग्रामसेवक व सरपंचांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली. 
-कुटुंबांच्या संख्येनुसार बहुतांश शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. 
-"स्वच्छ भारत मिशन'मध्ये विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी स्वत: मैदानात उतरले. त्यामुळे इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हिरीरिने पुढाकार. 

Web Title: Poladpur taluka haganadari on the way to freedom

टॅग्स