थांबण्याचा इशारा दिला, तरी `तो` थांबला नाही, अडवताच सापडले `घबाड`

police action on alcohol amboli konkan sindhudurg
police action on alcohol amboli konkan sindhudurg

आंबोली (सिंधुदुर्ग) - येथील तपासणी नाक्‍यावर आयशर टेम्पोतून गोवा बनावटीचा सव्वातीन लाखांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गोपाळ सुरेश गावडे (वय 32, रा. चौकूळ, नेनेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितासह तीन लाखांचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. 

याबाबत माहिती अशी, की येथील पोलिस तपासणी नाक्‍यावर पोलिसांची गस्त सुरू होती. रात्री साडेबाराच्या सुमारास आयशर टेम्पो येताना दिसला. हवालदार दत्ता देसाई यांनी टेम्पोला थांबण्याचा इशारा केला; मात्र तो थांबला नाही. चालकाने पुढे जात काही अंतरावर गाडी थांबवली. या वेळी तपासणी केली असता टेम्पोच्या हौद्यात गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा आढळून आला.

पोलिसांनी तीन लाख 24 हजारांची दारू व तीन लाखांचा आयशर टेम्पो असा मिळून सहा लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गोपाळ गावडे याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दत्ता देसाई, उपनिरीक्षक नितीन नरळे, उपनिरीक्षक जयराम पाटील, सहायक उपनिरीक्षक आत्माराम तेली, गजानन देसाई, हवालदार आर. बी. शेवडे, राजेश नाईक यांनी केली. दरम्यान, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी भेट देऊन आंबोली पोलिसांचे अभिनंदन केले. या वेळी हवालदार दीपक सुतार, सतीश कवीटकर यांनी भेट देत कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com