पोलादपुरात हत्यारांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

पोलादपुरात हत्यारांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

रायगड - महाड पोलादपूरमध्ये हत्याराची तस्करी सुरु असल्याची गुप्त माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी केलेल्या कारवाईत महाड तालुक्यातील ढालकाठी येथील रहिवासी तुलसीराम चंद्रकांत वाडकर (33) आणि पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील राजेंद्र राजू साटम यांना हत्यारासह अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 65 हजार 100 रुपयाचे जिवंत काडतूस, पिस्टल जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना ठाणे न्यायलयात हजर केले असता 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 12 नोव्हेंबरला मुंब्रा पोलिस ठाण्याचे पोलिस गस्त घालत असताना पोलिस उपनिरीक्षक बडे यांना जयेश वाईन शॉप समोर दिवा पूर्व येथे एक संशयित व्यक्ती गावठी कट्टा बाळगून गुन्हा करण्याच्या इराद्याने येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बडे आणि त्यांच्या पथकाने या तस्करीतील मुख्य आरोपी तुलसीराम वाडकरला राजेंद्र साटमसह अटक केली.

मोबाईलवर बातम्या वाचण्यासाठी सकाळचे अॅप डाऊनलोड करा

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलिस सहआयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलिस आयुक्त सत्यनारायण, डी. एस. स्वामी, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-1 ठाणे, रमेश धुमाळ सहाय्यक पोलिस आयुक्त कळवा विभाग याच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए. टी. बडे करीत आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील पोलिस पथक रायगडमध्ये येऊन हत्यारांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडत असताना जिल्ह्यात हत्यारे विकणारी टोळी असल्याबाबत रायगड जिल्हा पोलिसांना मात्र कोणतीच कल्पना नसल्याने याविषयी सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com