तीन वर्षांपासून चकवा देणार्‍या मंगळसूत्र चोरास अटक

अमित गवळे
बुधवार, 25 एप्रिल 2018

पाली : गेल्या तीन वर्षापासून पोलीसांना चकवा देणा-या मंगळसूत्र चोराला पाली पोलीसांनी नुकतेच पकडले. सोमवारी (ता.२३) त्याच्याकडून चोरलेले मंगळसूत्र (मुद्देमाल) हस्तगत केले. सन 2015 व सन 2016 या दरम्यान सबंधित आरोपीने तब्बल तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले होते.

या आरोपीचा तपास तीन वर्षांपासून पाली पोलीस करीत होते. या आरोपीचे नाव चंद्रकांत म्हात्रे असून हा आरोपी रोहा तालुक्यातील वरवठणे येथील रहिवाशी आहे. अतिशय चफलकपणे हा आरोपी मागील तीन वर्षापासून पोलीसांना चकवा देत होता. मात्र पाली पोलिसांनी सखोल प्रयत्नांनी व शिताफीने आरोपीच्या मुसक्या अावळल्या.

या अारोपीने 13-08- 2015 रोजी हिरा जानू शिद (वय 68) कुंभारशेत गावाजवळील फाट्यावर वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले होते. ही महिला करंजाई ठाकूरवाडी ते पाली या मार्गे बैठकीला पायी चालत जात होती. तर पाली बल्लाळेश्वर मंदिराकडून 20-08-2015 रोजी दुपारी चालत जाणा-या विद्या रविंद्र ठाकूर (वय.40) रा. पाली,देऊळवाडा या महिलेला मोटारसायकलवर बसवून पालीतील नर्सोबाच्या मंदीराच्या वरच्या बाजूस जंगलभागात नेऊन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. तर मे 2016 रोजी खुरावले फाटा येथून अरुणा खंडागळे रा. वर्‍हाड-जांभुळपाडा या लहान मुलीला घेवून आपल्या नातेवाईकांकडे चालत जात असताना आरोपीने लहान मुलीला कुठे चालत घेवून जाता, तुम्हाला सोडतो. असे म्हणून गाडीवर बसवून अरुणा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. 

या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील, पो.ह. प्रफुल चांदोरकर. पो. ना. विनोद पाटील, पो. कॉ. अमोल म्हात्रे आदी करीत होते. या तिन्ही चोरीच्या गुन्ह्याच्या घटनेची उकल करण्यात पाली पोलीसांना यश आले आहे.

Web Title: Police arrested robber who was absconding for three years