esakal | पोलिसांना हवी सुरक्षा साधने 

बोलून बातमी शोधा

Police Need \Security Equipment Sindhudurg Marathi News

देशात, राज्यात कोरोनाचे थैमान गेले काही दिवस सुरू आहे. प्रशासन, शासन यंत्रणा आपआपल्या परीने कार्य करत आहे हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे; मात्र गेले पंधरा दिवस सातत्याने पोलिस यंत्रणा महत्त्वाची जनसेवा बजावत आहे.

पोलिसांना हवी सुरक्षा साधने 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग पोलिस यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांना पुरेशी सुरक्षा मिळावी, यासाठी आवश्‍यक कीट उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

देशात, राज्यात कोरोनाचे थैमान गेले काही दिवस सुरू आहे. प्रशासन, शासन यंत्रणा आपआपल्या परीने कार्य करत आहे हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे; मात्र गेले पंधरा दिवस सातत्याने पोलिस यंत्रणा महत्त्वाची जनसेवा बजावत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या पोलिसांकडे मास्क व्यतिरिक्त कोणतेही साहित्य नसल्यामुळे अशा परिस्थितीतही अनेक संकटावर मात करीत दिवस-रात्र जनतेची सेवा बजावत आहे. 

जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात आधीच पोलिस बळ मुळातच कमी असल्यामुळे त्यांना कोरोना संचारबंदी कालावधीत तारेवरची कसरत करून ते सेवा देण्याचे काम करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पोलिस यंत्रणा अतिशय चांगली सेवा बजावत आहे. यामध्ये पोलिस यंत्रणा एसआरपी वाहतूक विभागाचे पोलिस अन्य पोलिस यंत्रणा यांचा समावेश आहे.

सामाजिक बांधिलकीतून सेवा बजावताना कुटुंबापेक्षा सर्व समाज आपले कुटुंब आहे या भावनेतूनच कार्यरत झालेले दिसून येत आहे. ही सेवा बजावत असताना त्यांच्या सुरक्षतेसाठी स्वतंत्र अशी कुठलीही व्यवस्था केलेली नाही. याची मात्र शासन पातळीवर प्राधान्याने दखल घेणे गरजेचे आहे. येथील लोकप्रतिनिधीनी या गांभीर्याची दखल घेऊन शासनदरबारी "सिक्‍युरिटी किट' साठी लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा केला पाहिजे.

यदाकदाचित कुठेतरी सडलेल्या अवस्थेत माणसाचा मृतदेह सापडल्यास सर्वप्रथम त्या ठिकाणी जनतेचे सेवक पोलीसच धावतात, अशावेळी संबंधित मृत व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही? हे त्या पोलिसांना माहिती नसते; मात्र त्या माणसाची सेवा करण्याचे काम पोलिस यंत्रणाच करीत असते. अशावेळी दुर्दैवाने संबंधित मृत हा कोरोनाबाधित आढळला तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलिसांना अनेक संकटाना सामोरे जावे लागणार आहे. या गांभीर्याची दखल राज्याने घेणे गरजेचे आहे. सर्व दृष्टिकोनातून विचार करता शासनाने "सिक्‍यिुरिटी किट' देणे तेवढेच महत्त्वाचे आहे.