तक्रारींच्या फोनने पोलिस हैराण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

वैभववाडी - विरोधी पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटतात, मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे, शंभर मीटर कार्यकर्ते मतदारांना आमिष  दाखवतात, गाडीतून मतदार नेणाऱ्यांवर कारवाई करा, अशा प्रकारे सोमवारी (ता.२०) रात्रीपासून पोलिस ठाण्यात सुरू झालेले फोन आज दुपारपर्यंत सुरूच होते. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची फोन करून तक्रार करीत होते. त्यामुळे पोलिस अक्षरशः हैराण झाले. दरम्यान, सकाळपासून मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ सुरू आहे. दुपारपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरिता आज सकाळी मतदान प्रकियेला सुरवात झाली. तत्पूर्वी सोमवारी रात्री कंदील प्रचारावरून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलिस ठाण्यात फोन करून तक्रारी करण्याची चढाओढ लागली होती. रात्री उशिरा अनेकांनी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याच्या तक्रारी केल्या. तक्रारीनुसार पोलिसांनी त्या त्या गावामध्ये  जावून खातरजमा केली; मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. परंतु पोलिसांनी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आज सकाळ पासून मतदान प्रकियेला सुरवात झाली. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर सकाळपासून गर्दी केली होती. चुरशीमुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मतदान करून घेण्याकरिता सक्रिय झाले होते. मतदारांना आणताना कार्यकर्ते आमिषे दाखवित असल्याच्या तक्रारी सुद्धा काहींनी फोन करून पोलिसांना सांगितल्या. त्यामुळे पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर असलेल्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. काही गाड्या अडवून पोलिसांनी तंबी दिली. 

Web Title: Police struck the phone complaints