गांजा, ब्राऊन शुगरविरोधात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

रत्नागिरी- गांजा, ब्राऊन शुगर या अंमली पदार्थांच्या विळख्यातून शहराची सुटका करण्याचा चंग पोलिस दलाने बांधला असून गेली काही दिवस या साखळीतील काही मोहरे वेचून साखळी खिळखिळीत करण्यात येत आहे.

थिबा पॅलेस रोडला कोंबिंग ऑपरेशन करून पाव किलो गांजा जप्त केला. या वेळी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर मच्छी मार्केट येथेही धाड टाकून चरस जप्त केला असून एका संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस  डीबी स्कॉड, ग्रामीण पोलिस, बाँबशोध श्‍वानपथक आदींनी ही कारवाई केली. पथकाने मिळलेल्या माहितीवरून दुपारी थिबा पॅलेस येथे धाड टाकली.

कारवाईत साईश्‍वरी अपार्टमेंटजवळील छोट्या खोलीत राहणाऱ्या सलमान ऊर्फ आकाश अशोक डांगे (रा. थिबा पॅलेस) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे पाव कलो गांजा जाप्त केला. मच्छी मार्केट येथे धाड टाकून अशरफ शेख ऊर्फ अडऱ्या याला ताब्यात घेतले. ब्राऊन शुगरची विक्री होत असलेल्या इमारतीत सर्च ऑपरेशन करून शंभर ग्रॅम गांजा व अठरा पुड्या ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. मुंबई अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५, ८ (सी) २७ अन्वये दोघांनाही ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. 

पोलिस उपनिरीक्षक श्री. शेडगे, श्री. अनघुले, श्री. बगड, प्रवीण बर्गे, प्रवीण खांबे, राहुल घोरपडे, महेश पाटील, विनोद भितळे, लक्ष्मण हरचकर, संदेश चव्हाण, बाँबशोध पथकातील श्री. भोळे, श्री. पाचवे आणि श्‍वान व्हिक्‍टर, महिला पोलिस रेवाळे, शिंदे, पवार आदींचा पथकात समावेश होता. 

Web Title: Polices combing operation against Ganja, Brown Sugar