5 वर्षे राजकीय उलथापालथ; त्रिशंकु स्थितीत बहुमतानं काँग्रेस सत्तेत

नगरपंचायतीतील सर्व नगरसेवक एकाच पक्षाचे असताना अखेरच्या क्षणी मोठे प्रवेशनाट्य घडले.
5 वर्षे राजकीय उलथापालथ; त्रिशंकु स्थितीत बहुमतानं काँग्रेस सत्तेत
Summary

नगरपंचायतीतील सर्व नगरसेवक एकाच पक्षाचे असताना अखेरच्या क्षणी मोठे प्रवेशनाट्य घडले.

वैभववाडी : वाभवे वैभववाडी (vaibhavwadi) नगरपंचायतीत त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्यानंतर मोठा पेच निर्माण झाला; परंतु त्यानंतर राजकीय पक्षप्रवेश नाट्याने तत्कालीन काँग्रेस (congress) पक्षाने बहुमत मिळवित सत्ता स्थापन केली. प्रारंभाप्रमाणेच त्यानंतर कायमच पाच वर्षे राजकीय उलथापालथी नगरपंचायतीत होत राहिल्या. नगरपंचायतीतील (Nagar panchayat election) सर्व नगरसेवक एकाच पक्षाचे असताना अखेरच्या क्षणी मोठे प्रवेशनाट्य घडले. त्यामुळे प्रारंभ, मध्यान्ह आणि अखेर प्रवेशनाट्यानेच झाली.

निवडणुकीनतंर त्रिशंकु स्थिती निर्माण झाली. तत्कालीन काँग्रेस पक्षाला ७, भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीला ६ आणि ग्रामविकास आघाडीला ४ असे पक्षीय बलाबल होते. त्यामुळे पहिल्या वहिल्या नगरपंचायतीत सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्याचवेळी ग्रामविकास आघाडीच्या दोन सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसचे बहुमत झाले. काँग्रेसने मॅजिक फिगर (Magic figure) गाठल्यानंतर ग्रामविकास आघाडीचे दोन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर एकमेकांचे नगरसेवक फुटु नयेत म्हणून काँग्रेस आणि शिवसेना भाजपाने स्वतंत्र गटाची नोंदणी केली.

5 वर्षे राजकीय उलथापालथ; त्रिशंकु स्थितीत बहुमतानं काँग्रेस सत्तेत
भाजपची सत्ता उलथवणं कठीण; अचूक व्युहरचनेतून काँग्रेसचं वर्चस्व

काँग्रेसने नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सव्वा वर्ष होण्याअगोदर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणखी एका नगरसेवकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसची नगरपंचायतीतील नगरसेवकांची संख्या दहावर पोहोचली. अडीच-तीन वर्षानंतर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सदस्य संख्या १२ वर पोहोचली. त्यामुळे नगरपंचायतीत भाजपचे केवळ पाच सदस्य राहिले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत वाभवे वैभववाडीच्या १२ ही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगरपंचायतीत सर्वच्या सर्व १७ आणि दोन स्विकृत असे १९ नगरसेवक भाजपचेच झाले. नगरपंचायतीवर एकहाती सत्ता भाजपाची झाली.

सुरूवातीपासून पक्षांतर, पक्षप्रवेश नाट्यांची झालेली सुरूवात येथेच थांबली नाही. अखेरच्या क्षणी नगराध्यक्ष भुषविलेले रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, दिपा गजोबार यांच्यासह संतोष पवार, स्वप्निल ईस्वलकर, रवींद्र तांबे यांनी मुंबईत मातोश्री गाठत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अलीकडे उपनगराध्यक्ष पद भुषविलेल्या संपदा राणे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नगरपंचायतीतील राजकारणांची सांगता देखील पक्षप्रवेशाने झाली. त्यामुळे नगरपंचायतीला पहिल्यापासून पक्षप्रवेश, पक्षांतर नाट्याचे ग्रहण अगदी शेवटपर्यत राहिले. त्याचा मोठा परिणाम नगरपंचायतीच्या विकासकामांवर झाला.

पक्षप्रवेशाचा विचार करणे गरजेचे

जितकी लहान नगरपंचायत तितके तेथील राजकारण अस्वस्थ असे म्हटले जाते. ते तंतोतंत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीला लागु पडले. त्याचा प्रत्यय गेल्या पाच वर्षात शहरातील मतदारांना आला. पक्षप्रवेश कुणी का करतो? याचा विचार मात्र या निमित्ताने होणे गरजेचे आहे.

5 वर्षे राजकीय उलथापालथ; त्रिशंकु स्थितीत बहुमतानं काँग्रेस सत्तेत
'एवढंच होतं तर..'; वरळी दुर्घटनेवरून पेडणेकरांची नितेश राणेंवर टीका

पाच वर्षातील नगराध्यक्ष

१) रवींद्र रावराणे

२) संजय चव्हाण

३) दिपा गजोबार

४) अक्षता जैतापकर

५) समिता कुडाळकर

६) रोहन रावराणे (प्रभारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com