पूजा पाटीलची उपजिल्हाधिकारीपदी निवड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील जालगाव येथील डॉ. पूजा पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली असून त्यांची यशदा  येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात  येणार आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील जालगाव येथील डॉ. पूजा पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली असून त्यांची यशदा  येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात  येणार आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल लागला. त्यात आयोगातर्फे घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी गट अ पदासाठी १४ जणांची ३० मे १८ मध्ये निवड करण्यात आली. त्यात पूजा पाटील यांचाही समावेश आहे. प्रशिक्षणानंतर राज्यातील एका जिल्ह्यात प्रोबेशनरी उपजिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात येईल. दापोली तालुक्‍यात जालगाव येथील गणेशनगर येथील त्या रहिवासी आहेत. पूजा पाटील ही जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी. ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षण त्यांनी पुणे येथे पूर्ण केले. खेड येथील योगिता डेंटल कॉलेजमधून त्यांनी बीडीएस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या डॉ. पूजा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे पाटील कुटुंबीय दापोलीतच स्थायिक आहेत. पूजा पाटील यांचे वडील सुदाम पाटील हे जिल्हा परिषद बांधकाम विभागात दापोलीत कार्यरत होते.

घरच्यांचे पाठबळ, जिद्द मेहनत व अभ्यास करण्याची आवड यामुळेच आपल्याला हे यश मिळाले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अभ्यास करून जिद्द बाळगल्यास कोकणातील विद्यार्थ्यांचीही प्रशासकीय सेवेत संख्या वाढेल. 
- पूजा पाटील

Web Title: Pooja Patil selected as the Deputy District Collector