गणेशोत्सवानंतर बाजारपूल खुला होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

चिपळूण :  पेठमाप आणि गोवळकोट भागाला चिपळूण शहराशी जोडणारा बाजारपूल गणेशोत्सवानंतर नागरिकांसाठी खुला होणार आहे.

चिपळूण :  पेठमाप आणि गोवळकोट भागाला चिपळूण शहराशी जोडणारा बाजारपूल गणेशोत्सवानंतर नागरिकांसाठी खुला होणार आहे.

आज सकाळी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पुलाची पाहणी केली. पुढील कामासंदर्भात ठेकेदाराला सूचना केल्या. या वेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर अभियंता श्री. कांबळे होते. साडेसहा कोटी रुपये खर्चाचे काम मुंबईतील एस. डी. इन्फ्रास्टक्‍चर कंपनीने वेळेत पूर्ण केले आहे. या कामासाठी रस्ते विकास अनुदान योजनेतून 3 कोटी 50 लाख आणि उर्वरित निधी पालिका फंडातून खर्च करण्यात येणार आहे. पावसाळा वगळून 24 महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट एजन्सीला दिली होती. त्यानुसार अत्यंत जलद वेगाने आणि अनेक अडचणींवर मात करून या पुलाचे काम झाले. अत्याधुनिक पद्धतीने या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्ट बसवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून नाईक कंपनीकडून जोडरस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. पेठमापकडे जाणाऱ्या जोडरस्त्याचे काम शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत तेही काम पूर्ण होऊन नागरिकांसाठी पूल खुला केला जाणार आहे.

Web Title: The pool will be open market Ganesh