Mothers Day : आपल्या मुलांबरोबर 'त्या' दहा मुलांच्या ही आई झाल्या 'या' वकिलीन बाई...

Poonam Chavan care of special ten children in sadavli kokan
Poonam Chavan care of special ten children in sadavli kokan

साडवली - आपला मुलगा स्वमग्न आहे असे समजल्यावर आईच्या हदयात चलबिचल सुरु झाली,या मुलाचे पुढे कसे होईल ? या विवंचनेतच त्याच्यावर उपचारही सुरु झाले.. अशा मुलांची आई होणे तसा हा कसोटीचाच क्षण.माञ डगमगुन न जाता अशाच स्वमग्न दहा मुलांचा त्यांनी संभाळ करायचे ठरवले व ते अमलातही आणले...

ही कहाणी आहे देवरुखमधील अॅड.पुनम चव्हाण-जाधव यांची.पुनम देवीदास जाधव यांना एकुण दोन मुलगे,एक मुलगी.पंधरा वर्षाचा शिवम हा स्वमग्न मुलगा.या मुलासाठी त्यांनी गेली दहा वर्ष आणखी दहा स्वमग्न मुले आपल्याच आॅफिसमध्ये ठेवुन त्यांच्या शिक्षणाची सोय केली.अशा मुलांच्या माता त्यांना कशा संभाळत असतील हा विचार घेवून शिवमसाठी पूनम यांनी दहा मुलांचे पालकत्व घेवून त्यांना आधार दिला आहे.या मुलांना सांभाळणार्‍या सौ.आरती गीते यांच्यावर ही जबाबदारी पुनम चव्हाण यांनी दिली आहे.

आज ही सर्व ११ मुले बुद्यांक कमी असूनही काहीना काहीतरी करत आहेत.हाताला द्याल ते काम ते करत आहेत.राखी बनवणे,आकाशकंदील बनवणे,कागदी लखोटे करणे यात ती पारंगत झाली आहेत.

आता तर साहस संस्था उभारुन या मुलांसाठी आणि तालुक्यातील विशेष गरजा असणार्‍या मुलांसाठी नेक्स्ट जनरेशनच्या माध्यमातून निवासी शाळेची उभारणी होणार आहे.यासाठी राजवाडे यांनी आपली जमीनही दिली आहे.भूमीपुजनही झाले आहे.पुनम चव्हाण यांनी आपल्या मुलाबरोबरच समाजातील अशा मुलांसाठी आधार देवून मातृदिनी मातृत्वाचा नवा दाखला दिला आहे.या मुलांसाठी समाजानेही दातृत्वाचा हात पुढे केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com