साळिस्ते येथील तरुणाला हवा मदतीचा हात

तुषार सावंत : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

कणकवली : घरात अठरा विश्‍व दारिद्य्र त्यातच दोन्ही किडनीच्या आजाराने डायलसिसची वेळ ओढवलेल्या साळिस्ते (ता. कणकवली) येथील सोनू मेस्त्री (वय 45) या तरुणाला मदतीचा हात हवा आहे. सोनू यांच्यावर सध्या कोल्हापूरमध्ये एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कणकवली : घरात अठरा विश्‍व दारिद्य्र त्यातच दोन्ही किडनीच्या आजाराने डायलसिसची वेळ ओढवलेल्या साळिस्ते (ता. कणकवली) येथील सोनू मेस्त्री (वय 45) या तरुणाला मदतीचा हात हवा आहे. सोनू यांच्यावर सध्या कोल्हापूरमध्ये एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

साळिस्ते मेस्त्रीवाडी येथील सोनू श्रीधर मेस्त्री हे कोल्हापुरात सुतारकाम करतात. त्यांची पत्नी मयुरी या आपल्या दोन मुलासह साळिस्ते येथे राहतात. मुलगी तन्वी ही सातवी तर मुलगा सोहम हा पाचवीत गावातील पुर्ण प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. वडीलांच्या आजारामुळे या दोन्ही मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. सोनू मेस्त्री गेले सहा महिने दोन्ही किडन्यांच्या आजारांनी त्रस्त आहेत. रुग्णालयात नियमितपणे डायलसिस करून घेतले जात आहे. यासाठी काही नातेवाईकांनी मदत केली. गावातील निवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर ताम्हाणकर हे मदत मिळविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्नशील आहेत.

सोनू मेस्त्री हे आपल्या एका नातेवाईकाकडे कोल्हापूर येथे सुतार काम करत होते. सध्या ते आजारी असल्याने घरातील आर्थिक उत्पन्नाचा मार्गच बंद झाला आहे. वडील श्रीधर हे वयोवृध्द असून घरात कमवणारे कुणीही नाही. प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी दोन्ही मुले हुशार आहेत. पण आई त्यांच्याकडे पुरेसा लक्ष देऊ शकत नाही. वडिलांच्या आजारपणामुळे मुलांच्या शिक्षणाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वडील आजारातून लवकर बरे झाले तरच मुलांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्‍न सुटणार आहे. सोनू यांच्या किडनी आजारपणातील डायलासीचा खर्च मेस्त्री कुंटूंबीयाना परवडणार नाही. अजून काही दिवस उपचार झाले तर सोनू हे बरे होवू शकतात पण त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची दानशूर व्यक्तीनी सोनू मेस्त्री यांना मदत करण्यासाठी त्यांची पत्नी मयुरी यांच्या बॅक ऑफ इंडियाच्या तळेरे शाखेतील 147810110002163 या खाते क्रमांकावर (IFSC कोड - BKID0001478) थेट मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: a poor man from kankavali needs help