शेतीत साकारले छत्रपती संभाजीराजे यांचे चित्र 

गवाणे - येथील अक्षय मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेले चित्र. 
गवाणे - येथील अक्षय मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेले चित्र. 

तळेरे - गवाणे येथील अक्षय मेस्त्री आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शेतामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र साकारले आहे. तिळाच्या शेतीमध्ये सुमारे एक एकर क्षेत्रात त्यांनी हा प्रयोग केला आहे. हे चित्र पाहण्यासाठी त्यांच्या शेतात गर्दी होत आहे.

जिल्ह्यात अशाप्रकारचा प्रयोग करणारे अक्षय मेस्त्री  हे पहिलेच ठरले आहेत. माळरानावर असलेल्या पडीक जमिनीत त्यांनी हे चित्र साकारले आहे. सुमारे दोन ते अडीच महिने इतका कालावधी हे चित्र साकारण्यासाठी लागला. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आकारात तिळाची शेती केली.

अशा प्रकारचा वेगळा प्रयोग करण्यासाठी अक्षयला त्याचे आजोबा शांताराम मेस्त्री, राजेश आयरे, गुरुराज बोबकर, आकाश मेस्त्री, प्रकाश पावरा, प्रसाद आयरे, आशिष गोरुले, शुभम राड्ये, अजय गोरुले, अनिकेत तोरसकर, राकेश तोरसकर, अतुल आरेकर आणि कोल्हापूर येथील रघुनाथ जाधव यांनी विशेष सहकार्य केले. 

चित्रकलेत वेगळा प्रयोग करावा या उद्देशाने मी हे चित्र साकारले आहे. ते तयार करण्यासाठी मला जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लागला. गवाणे येथील तिळाच्या शेतात एक एकर जमिनीवर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्यदिव्य चित्र साकारले आहे. सुरुवातीला संपूर्ण चित्राचे ले आउट तयार करून घेतले. त्यानंतर शेतात तिळाची पेरणी केली. आता आम्ही केलेला हा प्रयोग प्रत्यक्षात अवतरला आहे. 

- अक्षय मेस्त्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com