ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर 

सुनील पाटकर
बुधवार, 23 मे 2018

डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व शिफारशीसह सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात या मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवकांच्या वतीने 22 मे पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात महाड तालुक्यातील सर्व डाक सेवकांनी सहभाग नोंदवला.

महाड :  डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व शिफारशीसह सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात या मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवकांच्या वतीने 22 मे पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात महाड तालुक्यातील सर्व डाक सेवकांनी सहभाग नोंदवला.

 डाक सेवकांनी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरु केले आहे. हरिश्चंद्र चव्हाण, धनेश्वरी मुकुंदे, संतोष पालांडे यांच्या नेतृत्वाखाली डाक सेवकांनी मागण्या मान्य करण्यासाठी जोरदार घोषणा देत शासनाचे लक्ष वेधून घेतले. संपात देशातील एनयुजीडीएस, एआयजीडीएसयु, एनएफपीई, बीडीके, बीएमएस आदी संघटनांचे 3 लाख 65 हजार ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले असल्याची माहिती निवृत्त्त पोस्टमास्तर भाई शिरसाट यांनी दिली. ग्रामीण डाक सेवक हा ग्रामीण भागापर्यंत दळणवळणाचे संदेश देणारा एकमेव दूवा असून, तोच डाक सेवक दुर्लक्षित राहिला आहे. यापूर्वीही डाक सेवकांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेमुदत आंदोलने केली होती. पंरतु, आमच्या मागण्यांकडे केंद्र शासन दुर्लक्ष करत असल्याची खंत एआयजीडीआययूचे सल्लागार संतोष पालांडे यांनी व्यक्त केली.

Web Title: post office employees on strike