पाली खोपोली मार्गावरील 'त्या' खड्ड्यांमुळे अपघातांना अामंत्रण

अमित गवळे
बुधवार, 25 एप्रिल 2018

पाली : पाली खोपोली मार्गावर पालीच्या मिनिडोअर स्टँड व अागरअाळी जवळील रस्त्यावर मागील एक-दोन महिन्यांपासून मोठाले खड्डे पडले आहेत. वारंवर दुरुस्ती करुनही हे खड्डे पुन्हा डोके वर काढत आहेत. परिणामी अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिकांची देखिल गैरसोय होत आहे.

अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या पालीत प्रवेश करतांनाच या खड्यांचा समान प्रवाशी व भाविकांना करावा लागतो. या रस्त्याच्या खालून पाली गावाला पाणी पुरवठा करणारी मोठी पाईपलाईन गेली आहे. हि जुनी पाईप लाईन जिर्ण झाली आहे. त्यामुळे येथून अवजड वाहने गेल्यास अातील पाईप फुटतात व रस्त्यावर पाणी येते.

परिणामी येथून वाहने जावून तेथे मोठे खड्डे पडतात. हे खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालक बाजुने जातात त्यामुळे समोरुन येणार्या वाहणांची धडक बसण्याचा धोका आहे. तसेच अनेक वाहनचालक या खडड्यात अादळत देखिल आहेत. पादचार्यांना देखिल येथून वाट काढने अवघड होते. रात्रीच्या वेळी जाणार्या वाहणांना खड्डा न दिसल्याने त्यांची वाहने खड्ड्यात अापटतात.

दुचाकीस्वार देखिल खड्यातील पाणी, खडी व दगडावरुन घसरुन पडत आहेत. ग्रामपंचायतीने एक-दोन वेळा हि पाईप दुरुस्ती केली आहे. मात्र सतत वाहने जावून व निकृष्ट कामामुळे येथील खड्डे पुन्हा पुन्हा डोके वर काढत आहेत. तसेच पाईप लाईन फुटल्याने भर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय देखिल होत आहे.

या खड्यांमुळे वाहनचालक व पादचार्यांची खुप गैरसोय होत अाहे. तसेच अपघातांचा धोका देखिल वाढला आहे. वेळीच हे खड्डे योग्य प्रकारे बुजविण्याची गरज आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता अाहे.
- किरण खंडागळे, ग्रामस्त, पाली

Web Title: Potholes on Pali Khopoli road