सुधागडमध्ये मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत

dogs
dogs

पाली - सुधागड तालुक्यातील पाली व जांभुळपाडा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. तालुक्यातील वर्‍हाड व जांभुळपाड्यासह पालीतील १५ जणांना महिनाभरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावले आहे. त्यामुळे नागरीकांत प्रचंड घबराट पसरली आहे.

श्वान दंश झालेल्या जखमींवर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. श्वान दंश झाल्यानंतर जांभुळपाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमीला उपचाराकरीता आणले असता या ठिकाणी कायमस्वरुपी निवासी डॉक्टर उपलब्द नसल्याने नागरीकांना अनेक अडचणी व त्रासाला सामोरे जावे लागते. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरीक संतापले आहेत.

श्वान दंश झालेल्या जखमींना आवश्यक ती रेबीज लस व इंजेक्शन रुग्नालयात उपलब्ध आहेत. महिनाभरात श्वान दंश झालेल्या १५ जनांवर उपचार करण्यात आले आहेत. श्वान दंश झालेल्या व्यक्तीवर रुग्नालयात तातडीने उपचार करतो.
- डॉ. रुत्सम दामले, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली

मोकाट गुरांची नसबंदी करण्यासाठी यासंर्दभातील आवश्यक तो पत्रव्यवहार करुन लवकरच मोकाट कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल. 
- गणेश बालके, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com