कुडाळात लाचखोर वीज अभियंता जाळ्यात

कुडाळात लाचखोर वीज अभियंता जाळ्यात

कुडाळ - ट्रान्स्फॉर्मरमधून वीजपुरवठा चालू करून देण्यासाठी ४३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने येथील वीज कंपनीच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. १) रात्री उशिरा झाली. हरी महादेव कांबळे (वय ४२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार एमआयडीसी परिसरातील एका व्यक्तीने केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार असलेल्या व्यक्तीची एमआयडीसीमध्ये एक कंपनी आहे. त्यासाठी त्यांनी ट्रान्सफार्मर बसवला होता. त्यासाठी डीपी कनेक्‍शन मिळण्यासाठी कुडाळ कार्यालयात कांबळे याच्याकडे अर्ज दिला होता; मात्र विद्युत पुरवठा चालू करून देण्यासाठी कांबळे यांनी पैशाची मागणी केली. त्यामुळे याबाबतची तक्रार संबंधितांनी लाच लुचपत विभागाकडे केल्यानंतर कांबळे याला सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक मीतेश केणी, जनार्दन जवडकर, सुभाष गवस, नीलेश परब, अजित खंडे, पोतनीस यांनी केली.
सहाय्यक अभियंता कांबळे याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com