रत्नागिरी नगराध्यक्षपद पोटनिवडणूकीत शिवसेनेचे बंड्या साळवी विजयी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. दहा टेबलावर पाच फेऱ्यामध्ये ही मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत बंड्या साळवी यांनी सुमारे 500 मतांनी आघाडी मिळवली. 

रत्नागिरी - येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच प्रदीप उर्फ बंड्या साळवी विजयी झाले आहेत. या निवडणूकीत चार उमेदवार रिंगणात होते. भाजपचे दीपक पटवर्धन व राष्ट्रवादीचे मिलिंद कीर या निवडणूकीत पराभूत झाले. 

सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. दहा टेबलावर पाच फेऱ्यामध्ये ही मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत बंड्या साळवी यांनी सुमारे 500 मतांनी आघाडी मिळवली. त्यांना 2415 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी दिपक पटवर्धन यांना 1763, मिलिंद किर यांना 1228 मते मिळाली.

हेही वाचा - सावंतवाडीत केसरकरांना राणेंनी दिला धक्का 

प्रत्येक फेरीतील मिळालेली मते अशी

दुसऱ्या फेरीत  किर यांना 972, पटवर्धन यांना 1613, प्रदीप साळवी यांना 2715 मते मिळाली. तिसऱ्या फेरीत किर यांना 1484, पटवर्धन यांना 2126, प्रदीप साळवी यांना 1223 मते मिळाली. या फेरीत साळवी यांनी ११११ मतांनी आघाडी मिळवली होती. मतमोजणीच्या चौथ्या  फेरीत साळवी यांना 2016, पटवर्धन यांना 2330, किर यांना  2227 मते मिळाली. या फेरीत साळवी हे  800 मतांनी आघाडीवर होते. पाचव्या फेरीत शिवसेनेच बंड्या साळवी 1092 मतांनी विजयी झाले. 

हेही वाचा - कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी यांनी घेतला पुढाकार 

पंडीत यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक

दरम्यान शिवसेनेचे राहूल पंडीत यांनी राजीनामा दिल्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक लागली होती. अपेक्षेप्रमाणे शिवसेना या निवडणूकीत विजयी होणार हे निश्चित होते. पण राज्यातील घडामोडीचा या निवडणूकीवर परिणार होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. खासदार नारायण राणे यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी कोकणात भाजपचा विस्तार करण्यावर भर दिला आहे. याचा परिणाम या निवडणूकीत होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना त्यांनी पाठींबा दिला होता.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradeep Salvi Wins In Ratnagiri City President By election Marathi News