शिक्षणासाठी 'तिचा' रोज व्हिलचेअरवर प्रवास

सुनील पाटकर
रविवार, 2 डिसेंबर 2018

महाड : अपंगत्व आले म्हणून रडतखडत नशिबाला दोष देत बसणारे अनेक आहेत.
परंतु, त्या पलिकडे जाऊन जि्द्द व दृढ निश्चयाच्या जोरावर यावर मात करत आपला शैक्षणिक प्रवास प्रगती मारुती जाधव या तरुणींने सुरु ठेवला आहे. बारावीत शिकणाऱ्या प्रगतीचा व्हिलचेअरवर दररोज सात किलो मीटरचा प्रवास थक्क करणारा तर आहेच परंतु, अपंगत्व हे मनात असते शरिरात नसते. हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.
 

महाड : अपंगत्व आले म्हणून रडतखडत नशिबाला दोष देत बसणारे अनेक आहेत.
परंतु, त्या पलिकडे जाऊन जि्द्द व दृढ निश्चयाच्या जोरावर यावर मात करत आपला शैक्षणिक प्रवास प्रगती मारुती जाधव या तरुणींने सुरु ठेवला आहे. बारावीत शिकणाऱ्या प्रगतीचा व्हिलचेअरवर दररोज सात किलो मीटरचा प्रवास थक्क करणारा तर आहेच परंतु, अपंगत्व हे मनात असते शरिरात नसते. हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.

3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनच्यानिमित्ताने शिक्षणासाठी महाड जवळील गांधारपाले येथील अपंग तरूणीचा ध्येय्यवेडा प्रवास जाणुन घेतला आहे. 'प्रगती जाधव' ही विद्यार्थीनी महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. गांधारपाले गावात पेशाने शेतकरी असलेल्या जाधव दांपत्याची ही तिसरी मुलगी. 'प्रगती'च्या जन्माच्या वेळीच तिच्या पाठीला गाठ आली होती. ही गाठ न काढल्यास ती गतीमंद होऊ शकते अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. त्यामुळे तिची लहानपणीच शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु तिचा एक पाय हा अधूच राहिला. जन्मापासूनच अपंगत्व पदरात पडले असले तरी, प्रगती व तीचे आई वडील खचले नाहीत. गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत पहिलीला व्हिलचेअरवर प्रगती शाळेत जाऊ लागली. प्राथमिक शिक्षण तेथे घेतल्यानंतर तीचे माध्यमिक शिक्षण महाड येथील आदर्श विद्यालयात घेतले. आता ती बारावीत शिकत आहे. गांधारपाले ते महाड येथील महाविद्यालयामध्ये ये-जा करण्यासाठी सात किलोमीटरचे अंतर तिला पार करावे लागते. परंतु शिक्षणाची जिद्द असणारी प्रगती केवळ एक तासात व्हिल चेअरवरून हे अंतर पार पाडते. येण्या-जाण्यासाठी तिला दोन तास खर्च करावे लागतात व त्यानंतर ती घरी आपला अभयास करते.

ग्रामीण भागात रहात असतानाही तीची आई,वडिल व भावाने तिची शिक्षणाची तळमळ पाहिली. महाडला शाळेत सोडण्यासाठी अनेकदा तिची आईही मुलीबरोबर पायीच येत असे. पहिलीला पंचायत समितीकडून मिळालेली तिची व्हीलचेअर ती अजूनही कशीतरी दुरुस्त करुन वापरत आहे. घरची परिस्थिती बेताची असली तरीही प्रगतीला उच्च शिक्षण घेऊन भरारी मारायची आहे. घरी कुबड्या वापरून घरगुती कामाचा उरकही ती सहजपणे करत असते. सरकारकडून अपंगत्वाची सवलत जरी मिळत असली तरी हा खर्च पुरेसा नसल्याचे प्रगती सांगते. कोणत्याही परिस्थितीत पदवी संपादन करायचीच व त्यानंतर उच्च शिक्षणाचा विचार करायचा असा दृढ निश्चय तीने केला आहे.

प्रगतीला लहानपणापासुनच अपंगत्व असले तरी, तिची जिद्द अफाट आहे. दहावीत ती उत्तीर्ण झाली आता बारावीची तयारी सुरु आहे. आम्हा आईवडिलांचा तिला पूर्ण पाठिंबा आहे.
- मिनाक्षी जाधव ( प्रगतीचा आई)
 

Web Title: "Pragati" for the education of seven kilometer travel daily on the wheelchair