५० वर्षे काविळीवर औषध देणाऱ्या आजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

संगमेश्वर - तेऱ्ये बुरंबी येथील प्रमिलाताई श्रीकांत म्हैसकर या वयाच्या ८० व्या वर्षी देखील काविळीवर मोफत औषध देऊन रुग्णांना बरे करीत आहेत. तेऱ्ये बुरंबी गावाला प्रमिलाताईंनी मोफत रुग्ण सेवेतून एक वेगळी ओळख मिळवून दिली.

संगमेश्वर - तेऱ्ये बुरंबी येथील प्रमिलाताई श्रीकांत म्हैसकर या वयाच्या ८० व्या वर्षी देखील काविळीवर मोफत औषध देऊन रुग्णांना बरे करीत आहेत. तेऱ्ये बुरंबी गावाला प्रमिलाताईंनी मोफत रुग्ण सेवेतून एक वेगळी ओळख मिळवून दिली.

गरीब मुलांना स्वतःच्या घरी आसरा देऊन त्यांचा सर्व शैक्षणिक खर्चही त्यांचे कुटुंब करते. त्यांचे पती येथील हायस्कूलवर मुख्याध्यापक होते. वनौषधींपासून काविळीवर औषध द्यायला सुरुवात केली. रुग्णांना बरे वाटू लागल्याने प्रमिलाताईंची ख्याती जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता मुंबई, पुणेसारख्या शहरापर्यंत पोचली.

कोणाकडूनही औषधाचे मोल घ्यायचे नाही, असा निग्रह सुरुवातीलाच केला. असंख्य रुग्ण बरे झाल्यानंतर प्रमिलाताईंना आवर्जून भेटायला येतात आणि पैसे घेण्याचा आग्रह करतात, मात्र प्रमिलाताईंनी आजवर एकाही रुग्णाकडून एक रुपयाही स्वीकारलेला नाही. काविळीवर औषधाची वनस्पती अथवा मूळं सहज उपलब्ध होण्यासाठी आपल्याच घरपरड्यात लागवड केली आहे. या वनस्पतींची त्या स्वत: जोपासना करतात. 

गरीब मुलांना घरी आसरा
अत्यंत गरीब मुले,मुली यांना स्वतःच्या घरी आसरा देवून त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचे व्रतही त्यांनी जोपासले आहे.या मुलांना दहावी-बारावीपर्यंत शिकवून त्यांना दिशा देण्याचे काम प्रमिलाताई त्यांचे मुलगे दिलीप, दीपक, प्रसाद आणि सुना तेवढ्याच प्रेमाने करतात.

मला मोठ्या प्रमाणावर काविळ झाली होती.मात्र प्रमिलाताईंनी दिलेल्या औषधांमुळेच आपण काविळमुक्त झालो.
- कय्युम फुलारी , 

   भाजी विक्रेते, संगमेश्वर

Web Title: Pramilatai Mheskar special story

टॅग्स