निलेश राणे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर खलबते

सोमवार, 1 एप्रिल 2019

सावंतवाडी - सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभेसाठी युतीचे अधिकृत उमेदवार विनायक राऊत हेच आहेत. त्यामुळे घटक पक्षात सहभागी असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर खलबते सुरू आहेत. याबाबतचा अखेरचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळे आत्ताच मी काही सांगु शकत नाही,  असा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केला.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जठार बोलत होते. श्री. जठार म्हणाले, आत्तापर्यंत हम आपके है कोन, असे म्हणणारी शिवसेना - भाजप, आता हम साथ साथ है असे म्हणत आहे. त्यामुळे कोणी मोदींच्या नावावर  मते मागत असेल, तर ते चुकीचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राऊत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री चार तारखेला येणार आहेत. त्यावेळी याबाबत स्पष्ट भूमिका होईल.असे श्री. जठार यांनी सांगितेले. यावेळी राजन तेली, शिवसेना संपर्क प्रमुख शैलेश परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, अन्नपूर्णा कोरगावकर, श्वेता कोरगावकर, मनोज नाईक आदी उपस्थित होते.