भाजपचे प्रमोद जठार लोकसभा लढवणार ?

भाजपचे प्रमोद जठार लोकसभा लढवणार ?

कणकवली - भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार रोजगाराच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थन केले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

युतीची घोषणा झाल्यानंतर कोकणातील राजकारणातही रंग चढू लागला आहे. भाजपने नाणार प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यांचे जिल्हाध्यक्ष जठार हे यात आघाडीवर होते. युतीची घोषणा होत असताना नाणार प्रकल्पाची प्रक्रिया थांबवण्याची शिवसेनेची अट मान्य करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर रोजगाराच्या मुद्द्यावर जठार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबत संपर्क साधला असता आपण विचार करत असल्याचे जठार यांनी सांगितले. अद्याप पक्षाचा राजीनामा किंवा त्या अनुषंगाने कोणताही विचार केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com