45 टक्के मिळविणाऱ्या प्रथमेशची महाडमध्ये मिरवणूक

सुनील पाटकर
शुक्रवार, 8 जून 2018

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 90 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी आपल्या यशाचा आनंद पेढे वाटून साजरा करत होते. मात्र, महाडमध्ये 45 टक्के गुण मिळवलेल्या प्रथमेश राजेश डोळस या विद्यार्थ्यानेही आपल्याला मिळालेल्या या यशाचा आनंद तितक्याच उत्साहात साजरा केला. प्रथमेशला आपण दहावी परीक्षेत पास झाल्याचा अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला.

महाड : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर आज (शुक्रवार) झाल्यानंतर परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चर्चा होती ती 45 टक्के गुण मिळवणाऱ्या प्रथमेशची. कारणही तसेच होते. प्रथमेशच्या या यशाने आनंदित झालेल्या त्याच्या मित्रांनी चक्क मोटारसायकलवरुन मिरवणूक काढून आपल्या मित्राला शुभेच्छा दिल्या.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 90 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी आपल्या यशाचा आनंद पेढे वाटून साजरा करत होते. मात्र, महाडमध्ये 45 टक्के गुण मिळवलेल्या प्रथमेश राजेश डोळस या विद्यार्थ्यानेही आपल्याला मिळालेल्या या यशाचा आनंद तितक्याच उत्साहात साजरा केला. प्रथमेशला आपण दहावी परीक्षेत पास झाल्याचा अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसला.

प्रथमेश हा महाडमधील को.ए.सो.च्या वि. ह. परांजपे विद्यालयाचा विद्यार्थी आहे. दहावीत उत्तार्ण झाल्याची माहिती त्याला समजताच त्याचा आनंद गगनात मावेना. प्रथमेश पास झाल्याची माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्यांनाही अत्यानंद झाला आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या गळ्यात हार, शाल घालून जयघोष करत चक्क बाजारपठेतून मोटारसायकलवरुन प्रथमेशची मिरवणूक काढून आपल्या मित्राच्या यशाचा आनंद साजरा केला.

प्रथमेशदेखील जग जिंकल्याचा आनंद साजरा करीत मिरवणूक नागरिकांना अभिवादन करीत होता.  कोएसोचे संचालक दिलीप पार्टे यांनी प्रथमेशचे पुष्पहार घालून अभिनंदन करीत त्याच्या यशाला दाद दिली. आज दिवसभर प्रथमेशच अनेकांच्या चर्चेत राहिला.

Web Title: Prarthamesh which is earned 45 percent in SSC Exam

टॅग्स