हुतात्मा शुभमला शिवऋण प्रतिष्ठानतर्फे मानवंदना

जिल्हा रायगड
बुधवार, 11 एप्रिल 2018

पाली - आपल्या मातृभूमीच्या रक्षणाकरिता शत्रूच्या गोळ्या झेलून अवघ्या 20 वर्षांचा असताना शुभम सूर्यकांत मुस्तापुरे हा तरुण सैनिक हुतात्मा झाला. ग्रामीण भागातील तरुण व नागरिकांमध्ये लष्कर व आपल्या देशाबद्दल सार्थ अभिमान, स्फूर्ती व राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी शिवऋण प्रतिष्ठान व वावे गावातील तरुणांनी गावात श्रद्धांजली व जनजागृतीचे बॅनर लावले आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात अशा स्वरूपाचे बॅनर लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

समाजात देशाविषयी आणि भारतीय सैनिकांविषयी सन्मानाची भावना व राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, याकरिता महत्वाचे उपक्रम शिवऋण प्रतिष्ठान, पाली नेहमी राबवत असते.

तुम्ही- आम्ही सर्वजण जात, धर्म, राजकीय पक्ष या विषयांवर भांडत असतो. आणि तिकडे भारतीय सैनिक सीमेवर आपल्या रक्षणासाठी रक्ताचे पाणी करतात. जीवावर उदार होऊन शत्रुशी लढत असतात. त्यांचा मान सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. या करिता आम्ही सदैव तत्पर राहू म्हणून शहीद जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे या शूरविराला श्रद्धांजली देण्याचा हा उपरक्रम शिवऋण प्रतिष्ठान व वावे गावातील सर्व मुलांनी घेतला असल्याचे पतिष्ठान तर्फे सांगितले आहे.

''सर्व सुधागडातील जनतेला शिवऋण आवाहन करते की, प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी शाहिद शुभमचा बॅनर लावून त्याला श्रद्धांजली अर्पण करावी व देशप्रेम व्यक्त करावे. जेणेकरून समाजात देशाविषयी व सैनिकांविषयी प्रेम आणि सन्मान निर्माण होईल''.
केतन म्हसके, उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान

Web Title: Pratishthan has honored Hautatma Shubhama