अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे पालीत पुजन

अमित गवळे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सुधागड तालुक्यातील राबगाव येथून वाजपेयी यांच्या प्रतिमेसह फुलांनी सजविलेल्या रथातून पालीत अस्थीकलश आणण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालीत उपस्थित राहून अस्तिकलशाचे पुजन केले.

पाली (जि. रायगड) - अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थीकलश गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पुजन व दर्शनासाठी आणण्यात आले. सुधागड तालुक्यातील राबगाव येथून वाजपेयी यांच्या प्रतिमेसह फुलांनी सजविलेल्या रथातून पालीत अस्थीकलश आणण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालीत उपस्थित राहून अस्तिकलशाचे पुजन केले.

वाजपेयी यांच्या अस्तीकलशाचे दर्शन सर्वांना घेता यावे याकरीता राज्य व देशभरात त्यांचे अस्थीकलश नेण्यात आले. पालीत या अस्तीकलशाचे सर्वांनी मोठ्या श्रध्देने दर्शन घेवून पुजन केले. यावेळी भाजप सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा यांनी आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले की वाजपेयी सामाजिक जिवनातील निष्कलंक, अभ्यासू, समतोल, विचारी, व्यवहार आणि आचरणाचा मुर्तीमंत आदर्श होते. भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे विकसीत भारताच्या पायाभरणीत अमृततुल्य योगदान राहिले आहे. त्यांच्या रुपाने देशाने एक आदर्श, चारित्र्यसंपन्न व थोर व्यक्तीमत्व गमाविले असल्याची भावना व्यक्त केली. विष्णु पाटील यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या रुपाने उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले असल्याचे सांगत आदरांजली अर्पण केली.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत यांनी अटलबिहारी वाजपेयी हे विरोधकांनाही आपलेसे वाटणारे अजातशत्रु व्यक्तीमत्व होते. त्यांच्या रुपाने सच्चा राष्ट्रभक्त व कविमनाचा नेता हरपला असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी भाजप नेते विष्णु पाटील, भाजप जिल्हा सरचिटणिस सुनिल दांडेकर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र राऊत, भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सुधागड तालुका भाजप अध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुका भाजप माजी अध्यक्ष राजेंद्र गांधी, सुधागड तालुका भाजप सरचिटणिस शिरिष सकपाळ, आलाप मेहता, ज्येष्ट कार्यकर्ते विजय धारीया, निखिल शहा, आदिंसह भा.ज.पा पदाधिकारी, विवीध पक्षांचे पदाधीकारी, नागरीक, व विद्यार्थी उपस्थीत होते. तसेच पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर, सुधागड वनक्षेत्रपाल समिर शिंदे, शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन, ग.बा. वडेर हायस्कुलचे मुख्याध्यापक अजय पाटील अादी उपस्थित होते.

 

Web Title: prayer for atal bihari vajpayee at paali raigad