ओखी वादळानंतर कोळी बांधवांची मासेमारीची तयारी

अच्युत पाटील
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बोर्डी : ओखी चक्रीवादळाच्या तडाख्या नंतर संकटात सापडलेला मच्छीमार बांधव वैशाख शुद्ध बारसच्या मुहूर्तावर आपले नशीब अजमाण्याचा प्रयत्न करणार आहे. गुरूवारी (ता. 26) सकाळी झाईच्या जेट्टीवर मासेमारीसाठी जाण्याची जोरदार तयारी सुरू होती. नौकांमध्ये, पाणी, डिझेल, धान्य, लाकूड भरण्यासाठी खलाशांची लगबग सुरू होती.

मागील पाच उधाणात मासेमारीचे प्रमाण फारच कमी असल्याने व्यवसाय डबघाईला गेला आहे. किराणा सामान उधारीवर आणून उदरनिर्वाह केला जात आहे. मासेमारीला जाण्यासाठी दागिने गहाण ठेवून खर्च केले जात आहेत. सात दिवसाच्या एका खेपेसाठी एका नौकेला किमान वीस हजार रुपये खर्चाची तरतूद करावी लागते. बाजारात मंदीचे सावट असल्याने व्यापाऱ्यां कडून आगाऊ पैसे मिळणे बंद झाले आहे.

अशा परिस्थितीत मच्छिमार नशीब अजमाणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस समुद्रातील मच्छिमारी बंद होणार आहे. तत्पूर्वी दोन वेळा समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची संधी आहे. नशिबाने साथ दिल्यास वाचलो असे समजावे अन्यथा वाताहात अशी भिती व्यक्त करताना झाई मांगेला समाज मच्छीमार सोसायटीचे सचिव सुरेश दवणे म्हणाले, यापुढे संसाराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहेच. पुस्तक, वह्या ईतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आणायाचा?

चालू हंगामासाठी कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवलेले दागिने सोडवता आले नाही. तर पुढील हंगामाची तयारी कशी करणार असा यक्ष प्रश्न पडला असून एकदा नशीब अजमाण्याचा अखेरचा प्रयत्न करीत आहे असे दवणे यांनी सांगितले.

Web Title: preparation for fishery after okhi cyclone by koli brothers