टर्मिनसच्या प्रेझेंटेशनचा मुहूर्त गुरुवारचा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

रत्नागिरी - कोकणातील सर्वांत मोठे ट्रक टर्मिनस रत्नागिरी शहरात होत आहे. या टर्मिनसच्या प्रेझेंटेशनला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी (ता. 27) सायंकाळी 4 वाजता पालिकेत हे प्रेझेंटेशन होणार आहे. विकासक टर्मिनसमध्ये नेमक्‍या काय सुविधा देणार, कसे असेल टर्मिनस, हे या माध्यमातून सदस्यांना दाखविण्यात येणार आहे. 

रत्नागिरी - कोकणातील सर्वांत मोठे ट्रक टर्मिनस रत्नागिरी शहरात होत आहे. या टर्मिनसच्या प्रेझेंटेशनला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी (ता. 27) सायंकाळी 4 वाजता पालिकेत हे प्रेझेंटेशन होणार आहे. विकासक टर्मिनसमध्ये नेमक्‍या काय सुविधा देणार, कसे असेल टर्मिनस, हे या माध्यमातून सदस्यांना दाखविण्यात येणार आहे. 

शहरातील साळवी स्टॉप येथील सुमारे 161 गुंठ्यांचा प्लॉट आरक्षित होता. त्यावर हे ट्रक टर्मिनस उभारण्यात येणार होते. मात्र, मूळ मालकाला रेडिरेकनर प्रमाणे जमिनीचा मोबदला देऊन ते विकसित करण्याची आर्थिक परिस्थिती पालिकेची नाही. म्हणून विकासकाला आरक्षण देऊन त्यांच्याकडून 50 टक्के जमिनीवर ट्रक टर्मिनस उभारण्यात येणार, तर 50 टक्के जागा विकासक विकसित करण्याच्या अटीवर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारानुसार परवानगी देण्यात आली. 

मात्र, सुरवातीपासून टर्मिनसचा विषय वादग्रस्त ठरला. मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग या भागातूून जाणार आहे, त्याबाबत काही स्पष्टीकरण झालेले नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या मासिक सभेमध्ये विरोधकांनी पुन्हा हा विषय लावून धरला. विकासकाने ट्रक टर्मिनसचे काम सुरू करण्यापूर्वी स्वतःचे काम सुरू केले आहे.

जोवर ट्रक टर्मिनस विकसित करून पालिकेच्या ताब्यात दिले जात नाही, तोवर विकासकाच्या कामाला स्थगिती द्यावी, असा आक्षेप घेत कामाला स्थगिती देण्याचा ठराव घेतला. पालिका मुख्याधिकारी श्री. माळी यांनी लवकरच प्रेझेंटेशन घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार 27 डिसेंबररोजी सायंकाळी 4 वाजता ट्रक टर्मिनसचे प्रेझेंटेसन केले जाणार आहे. 

बऱ्याच बाबींचा खुलासा नाही.... 

50 टक्के म्हणजे 81 गुंठ्यामध्ये ट्रक टर्मिनस उभे राहणार आहे. त्यासाठी दिलेली परवानगी दिशाभूल करणारी आहे. टर्मिनसमध्ये किती बांधकाम करायचे, कोणत्या सोयी व सुविधा देणार, कोणत्या बाजूचा भूखंड पालिकेला विकसित करून ताब्यात देणार आहे, याचा खुलासा झालेला नाही. 

Web Title: presentation of the terminus on Thursday