जेव्हा राष्ट्रपती विचारतात, सरपंचजी यहाँ सब ठिक है ?

राष्ट्रपतींच्या प्रश्नाने अचंबित; सरपंचजी यहाँ सब ठिक है, या कुछ बताना है आपको, असा प्रश्न विचारत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरपंच किरण धामणे यांच्याशी संवाद साधला.
President Ram Nath Kovind question to Sarpanch Kiran Dhamne Sunil Tatkare
President Ram Nath Kovind question to Sarpanch Kiran Dhamne Sunil Tatkaresakal

मंडणगड : सरपंचजी यहाँ सब ठिक है, या कुछ बताना है आपको, असा प्रश्न विचारत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरपंच किरण धामणे यांच्याशी संवाद साधला. आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात अभिवादनानंतर राष्ट्रपती महोदय यांनी काही काळ स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी धामणे यांची अवस्था संमोहित झाल्यासारखी होती. (President Ram Nath Kovind in Konkan)

आंबडवे भेटीदरम्यान राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट दिली व महामानावस अभिवादन केले. या कार्यक्रमानंतर स्मारकात शिगवण ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण धामणे यांनी महामहीम राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी सरपंच किरण धामणे यांनी, आजचा दिवस आमच्या गावाचे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला जाईल. आपल्या या भेटीमुळे राज्यासह रत्नागिरी जिल्हा आणि मंडणगड तालुक्याचा गौरव वाढला आहे. या क्षणाला आम्ही स्वतःला धन्य मानीत आहोत, अशी भावना व्यक्त केली. यानंतर राष्ट्रपती महोदयांनी अनपेक्षितपणे सरपंचजी यहाँ सब ठिक है, या कुछ बताना है आपको असे म्हणताच क्षणभर अंचबित झालेल्या सरपंच किरण धामणे यांना शिगवण ग्रामपंचायत विशेषतः आंबडवे गावाचे प्रश्नाविषयी, गावाच्या समस्यांविषयी राष्ट्रपतींना माहिती दिली. राष्ट्रपतींशी झालेल्या या संवादाची माहिती सरपंच किरण धामणे यांनी माध्यमांना कार्यक्रमानंतर दिली.

गावात मोबाईल टॉवरच नाही

बाबासाहेबांचे मूळ गाव पाहण्यासाठी देश विदेशातून लोक आंबडवे गावी येतात. त्यांना यथायोग्य सुविधा मिळत नाहीत, गावात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. शासन दरबारी सर्व कामकाज ऑनलाईन झाले आहे, पण गावात मोबाईल टॉवरच नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावातील या प्रमुख समस्या मांडल्याचे किरण धामणे यांनी सांगितले.

मॉडेल कॉलेजचे काम मार्गी लावा

राष्ट्रपतींशी झालेल्या संवादात गावाच्या समस्या मांडताना सरपंच किरण धामणे म्हणाले, ‘आंबडवे येथे युजीसीने मॉडेल कॉलेज २०१२ मध्ये सुरू केले आहे. या कॉलेजच्या इमारतीचे काम आजअखेर पूर्ण झालेले नाही. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदार सुनील तटकरे यांना हे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी लक्ष देण्याची सूचना केली. आंबडवे गावात रोजगार नसल्याने रोजगाराचे शोधात येथील नागरिक मुंबईसारख्या महानगरात स्थलांतरित होत आहेत. त्यांना जर स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, तर इथली लोक इथंच राहतील व गावे गावासारखी दिसतील,’ असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com