वेळप्रसंगी राष्ट्रवादी स्वबळावर : सामंत

press conferance ncp sawantwadi konkan sindhudurg
press conferance ncp sawantwadi konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्हा बॅंकेसह सहकारातील निवडणुका जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून लढविण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका असली तरी ग्रामपंचायत व अन्य निवडणुकांची पुनरावृत्ती नको. याची खबरदारी शिवसेनेने घेतली पाहिजे. वेळप्रसंगी राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे स्पष्ट केले. 

सहकारामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सन्मान मिळायला हवा, असेही ते म्हणाले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, पक्ष निरीक्षक शिवाजी घोगळे व हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, की ""सावंतवाडी मतदारसंघात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बॅंक संचालक व्हीक्‍टर डान्टस, उपाध्यक्ष सुरेश दळवी, पक्ष निरीक्षक अर्चना घारे-परब हे पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या पाठिशी आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहेत. सहकारात अनेक वर्षे सुरेश दळवी, व्हिक्‍टर डॉन्टस आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस सहकार क्षेत्र निवडणूक लढवेल. 

ग्रामपंचायत निवडणुकीत आणि अन्य निवडणुकीसारखी स्थिती सहकारात होवू नये, म्हणून शिवसेनेने खबरदारी घेतली पाहिजे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची सहकारात वाटचाल सुरू आहे. जिल्हा बॅंकेचे 6 संचालक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. आता सुरेश दळवी, व्हिक्‍टर डॉन्टस निवडणूक निर्णय घेतील.'' माजी राज्यमंत्री भोसले म्हणाले, ""राष्ट्रवादीची शहरातील ताकद लक्षात घेऊन सन्मान मिळावा म्हणून सुरेश दळवी, व्हिक्‍टर डॉन्टस प्रयत्न करतील. जिल्हा बॅंक निवडणूक फार महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांनी देखील याकडे लक्ष वेधले आहे.'' 

पक्षाचा वरचष्मा रहायला हवा 
सामंत म्हणाले, ""तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष देण्यात आले आहेत. त्यामुळे या तालुक्‍यात पूर्वीसारखी राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्यावर त्यांनी भर द्यावा. सत्यजित धारणकर यांना जिल्हा कार्यकारिणीवर घेतले जाईल. नगरपरिषद, नगरपंचायत, सहकार बॅंकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा राहायला हवा. म्हणून जिल्ह्यात प्रयत्न केले जात आहेत.''

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com