महावितरणची माॅन्सूनपूर्व नियोजनाकडे पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

सावंतवाडी - तालुक्‍यातील महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा यंत्रणेची दुरुस्तीची कामे अद्यापही हाती न घेतल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. गोवा सीमेजवळील दशक्रोशीमध्ये अजूनही ही स्थिती कायम आहे. बऱ्याच ठिकाणी वीज रोहित्र यंत्राजळवची साफसफाई तसेच फांद्याची छाटणी केलेली नाही.

सावंतवाडी - तालुक्‍यातील महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा यंत्रणेची दुरुस्तीची कामे अद्यापही हाती न घेतल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. गोवा सीमेजवळील दशक्रोशीमध्ये अजूनही ही स्थिती कायम आहे. बऱ्याच ठिकाणी वीज रोहित्र यंत्राजळवची साफसफाई तसेच फांद्याची छाटणी केलेली नाही.

पावसाळा सुरु झाला की विजेचा लपंडाव सुरू होतो. यात वीज पुरवठा कमी उच्च दाबाने झाल्यास घरातील उपकरणावर त्याचा परिणाम होतो. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फटका बसतो. गोवा सीमेकडील भागातील दशक्रोशी गावात अद्यापही वीज वितरणकडून माॅन्सूनपूर्व कामांना सुरवात केली नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाची कामे करण्यात येत आहे. दरम्यान पावसाळा सुरू झाला की महावितरणचे कर्मचारी पळवाटा काढण्याच्या स्थितीत दिसून येतात. गोव्याशेजारी येणाऱ्या या दशक्रोशीतील साटेली, कोंडूरे, दांडेली, आरोस, पाडलोस, न्हावेली, मळेवाड, गुळदूवे गावात अद्यापही महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेतलेली नाही. बऱ्याच ठिकाणी रोहित्र यंत्रांची पाहणी केलेली नाही. तसेच महावितरणच्या वाहिन्यावर आलेल्या फांद्याही तशासच आहेत. मान्सूनपूर्व कामामध्ये आवश्‍यकतेनुसार उच्चदाब व लघूदाब वाहिन्या, रोहित्रांची देखभाल तसेच दुरुस्ती, तारा ओढणे, वाकलेले खांब सरळ करणे, तुटलेले खांब बदलणे, झाडी झुडपे असल्यास त्या दुर करणे, आवश्‍यक ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकणे आदी अनेक कामांची आवश्‍यकता असते. अन्यथा ग्रामीण भागातील लोकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागणे हे दरवर्षीचेच आहे. मुसळधार पावसात वीज वाहिन्यावर फांद्या तुटून पडण्याची शक्‍यता असते. यासर्वाचा अंदाज घेवून महावितरणने मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्‍यक होते; मात्र पाहिजे तशी कामे हाती न घेण्यात आल्यामुळे ग्रामस्थांत संतप्त भावना आहे. 

Web Title: previous planning of MSEDCL