चिपळूणातील नागरिकाच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून त्वरीत दखल घेण्यात आली. सामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतली जाते याचा सुखद अनुभव नागरीकांना अनुभवता आला.

चिपळूण - चिपळूणच्या मार्कंडी भागातील भारत पेट्रोलियमच्या मेहेता पेट्रोल पंपावरील दोन पैकी एक डिस्पेन्सर गेले आठ महिने बंद आहे. होणार्‍या गैरसोयीबद्दल येथील अविनाश जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून त्वरीत दखल घेण्यात आली. सामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतली जाते याचा सुखद अनुभव नागरीकांना अनुभवता आला.

मेहेता पेट्रोल पंपावरील एक डिस्पेन्सर बंद असल्यामुळे लांबच लांब रांगा लागत होत्या. वाहानधारकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांनी याबाबत पंपचालक मेहेता यांचेकडे अनेकवेळा तक्रारी नोंदविल्या. भारत पेट्रोलियमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार झाली मात्र भारत पेट्रोलियमकडून आश्वासना व्यतिरिक्त प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अविनाश जोशी यांनी पी.एम.ओ वेब-साईटवर 21 मे 2018 ला तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाची पंतप्रधान कार्यालयाकडून सात दिवसात दखल घेण्यात आली. 28 मे रोजी भारत पेट्रोलियमच्या गोवा येथील विभागीय कार्यालयाकडे जोशी यांचा अर्ज वर्ग करण्यात आला. त्या नंतर पुढील दोन दिवसात कंपनीचे विक्री प्रतिनिधी दया हंबीर यांनी चिपळूणमध्ये येऊन तक्रारदार श्री जोशी यांची भेट घेतली व एक महिन्याचे आत नवीन डिस्पेन्सर बसवत असल्याचे लेखी पत्र त्याना सादर केले. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: prime minister office noticed a complaint of chipluns Citizens