मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बसला आग

मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बसला आग

कणकवली - मुंबई - गोवा महामार्गावर पावलो ट्रॅव्हल्स कंपनीच्या वातानुकूलित लक्झरी बसला आग लागली. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेत  बस जळून खाक झाली आहे.  ही दुर्घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. 

आगीची घटना समजताच घटनास्थळी कुडाळ येथून अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या बसमध्ये देशी आणि विदेशी असे 40 पर्यटक होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पावलो ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. चालकाला गाडीतील प्रवाशांनी धूर येत असल्याची कल्पना दिली. तरीही अर्धा तास त्यांनी बस थांबवली नाही. मात्र जेव्हा आग लागली तेव्हा बस थांबवण्यात आली. झोपलेल्या प्रवाशांना उतरवण्यात आले. बसमधील काही सामान बाहेर काढण्यात आले, मात्र आतील सामान बाहेर काढणे शक्य नव्हते कारण आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले होते. मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता धोकादायक आहे. रस्त्याचे काम सुरू असलेल्या जागेवर बसने पेट घेतल्याने दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com