भोसले उद्यान मिळणार खासगी कार्यक्रमांसाठी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - पालिकेचे वार्षिक उत्पन्न वाढावे यासाठी आज येथे सादर करण्यात आलेल्या शिलकी अर्थसंकल्पादरम्यान विविध निर्णय घेतले. यात पालिकेचे शिवउद्यान अर्थात जगन्नाथराव भोसले उद्यान खासगी कार्यक्रमासाठी भाड्याला देण्याबरोबर मोकळ्या जागा व जिमखाना मैदानाच्या भाड्यात वाढ केली आहे. 

ही माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली. श्री. साळगावकर यांनी आज आपल्या काळातील सलग सहावा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आपल्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी आनंद नेवगी, बाबूू कुडतरकर, सुरेद्र बांदेकर, शुभांगी सुकी, आनोरोजीन लोबो, भारती मोरे आदी उपस्थित होते.

श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आजच्या अर्थसंकल्पात काही कर वाढविण्यात आले आहेत. यात घरपट्टी आणि पाणी पट्टीच्या कराचा समावेश आहे. पाण्यावर दर हजारी लिटर मागे तीन रुपये वाढ केली आहे. तर यापुढे कधीही घरपट्टीत वाढ होणार नाही. यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. पालिकेच्या जिमखाना मैदानाचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. खासगी वापरासाठी किवा खेळा व्यतिरिक्त अन्य कामांसाठी ते मैदान वापरण्यात येऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दिवसाला दहा हजार असलेले भाडे आता चाळीस हजार रुपये केले आहे. लग्न सभारंभासाठी पालिकेचे जगन्नाथराव भोसले उद्यान भाड्याला देण्यात येणार आहे. यासाठी दिवसाला वीस हजार रुपये भाडे ठरविण्यात आले, असून त्या दिवशी अन्य नागरिकांसाठी उद्यान बंद ठेवले जाणार आहे. डॉक्‍टर स्वार यांच्या समोरील उद्यानाचे भाडे क्रिकेटसाठी पाचशे रुपये, वाणिज्य वापरासाठी एक हजार रुपये आणि राजकीय सभांसाठी दहा हजार रुपये एका दिवसासाठी ठरविण्यात आले आहे. शिल्पग्राम तीन हजार रुपये, बॅ नाथ पै सभागृहासाठी दहा हजार रुपये, असे दर ठरविण्यात आले आहेत.’’ श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘सांडपाणी दाखला, इमारत पूर्णत्वाचा दाखल्यासाठी एक हजार रुपये, जन्म मृत्यू दाखल्यासाठी तीस रुपये, घरपत्रक उताऱ्यासाठी पन्नास हजार रुपयाचा समावेश आहे.’’

आता पुढच्या वर्षात घरपट्टीच्या रकमेत वाढ होणार नाही. लोकांना चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागच्या वर्षी निवडणुकांमुळे रेंगाळलेल्या सावंतवाडी पर्यटन महोत्सवासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष

Web Title: Private events will Bhosle Park