कामकाज लोकाभिमुख करणार - प्रियांका साळसकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

देवगड - देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या माध्यमातून जामसंडे शहरवासीयांना टप्प्याटप्याने विविध सोयीसुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले जाणार असून नगरपंचायतीचा कारभार लोकाभिमुख करण्यावर अधिक भर देणार असल्याचे देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी आज जामसंडे येथे स्पष्ट केले. 

देवगड - देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या माध्यमातून जामसंडे शहरवासीयांना टप्प्याटप्याने विविध सोयीसुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले जाणार असून नगरपंचायतीचा कारभार लोकाभिमुख करण्यावर अधिक भर देणार असल्याचे देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी आज जामसंडे येथे स्पष्ट केले. 

जामसंडे परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीतर्फे पूर्वीच्या जामसंडे ग्रामपंचायत कार्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्‌घाटन आज नगराध्यक्षा साळसकर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेवक ए. वाय. जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळ खडपे, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्‍वर खवळे उपस्थित होते. 

श्री. जाधव म्हणाले, ‘‘जामसंडेमधील वाड्या व नगरांची संख्या पाहता शहरवासीयांच्या सोयीसाठी नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतींनीही सुविधा केंद्राला वेळ द्यावा. शहरातील रस्त्यांना नावे देऊन कमानीही उभारल्या जाव्यात. शहरात प्रमुख ठिकाणी पाणपोई उभारण्यात यावी. तसेच गुरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल का ते पहावे. वनौषधी लागवड करून शहराचे सुशोभीकरण करण्याकडे लक्ष दिले जावे. एक आदर्शवत नगरपंचायत बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. प्रास्ताविक श्री. कंकाळ यांनी केले. 

जामसंडे परिसरातील नागरिकांना शासकीय सुटीचा दिवस वगळून सोमवार व गुरुवार असे आठवड्यातील दोन दिवस सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घरपट्टी, पाणीपट्टी भरणा तसेच सर्व प्रकारचे दाखले या नागरी सुविधा केंद्रातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील. ज्यांना तातडीने दाखल्याची गरज भासेल त्यांना नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयात केव्हाही दाखले उपलब्ध होतील. या सुविधा केंद्रामुळे जामसंडे शहरवासीयांची चांगली सोय झाली असून याचा त्यांनी लाभ घ्यावा.
- प्रियांका साळसकर, नगराध्यक्षा

Web Title: priyanka salaskar talking