पालीत कच-याची समस्या गंभीर

अमित गवळे
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पाली - अष्टविनायाकापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत कच-याची समस्या गंभीर झाली आहे. कचरा कुंड्यांची दुरवस्था, अपुरे सफाई कर्मचारी आणि जनजागृतीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे येथील कचरा प्रश्नाने उग्र रुप घेतले आहे.

पाली - अष्टविनायाकापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत कच-याची समस्या गंभीर झाली आहे. कचरा कुंड्यांची दुरवस्था, अपुरे सफाई कर्मचारी आणि जनजागृतीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे येथील कचरा प्रश्नाने उग्र रुप घेतले आहे.

पालीत प्रवेश केल्यावर रस्त्याच्या बाजुला, इमारती आणि मोकळ्या जागेत कचर्याचे ढिग पहायला मिळतात. पालीत या आधी सिंमेंटच्या तसेच विटांचे बांधकाम असलेल्या कचरा कुंड्या होत्या. त्या तुटल्या व मोडकळीस आल्या होत्या. त्यातून घाण व कचरा वारंवार बाहेर येत होता. यावर उपाय म्हणून मागील वर्षी ग्रामपंचायतीने विविध ठिकाणी ४० डस्टबीन (प्लास्टिक कचरा कुंड्या किंवा ट्रॉली) ठेवल्या होत्या. मात्र या प्लास्टिक डस्टबिन ट्रॉलीची पुरती दुरवस्था झाली आहे. तसेच या कचराकुंड्या अपुर्या क्षमतेच्या होत्या. कुत्रे व गुरेढोरे येथे खाणे शोधण्यासाठी जातत व हे डस्टबीन रस्त्यावर पडायच्या. त्यामुळे रस्त्यावर घाण व कचरा पसरायची. ह्या प्लास्टिक डस्टबीन ट्रॉली फुटल्या देखील आहेत. मात्र आता क्वचित ठिकाणीच या ट्रॉल्या अआता शिल्लक आहेत. त्यामुळे लोकांना घाण व कचरा कुठे टाकावा हा प्रश्न पडला आहे. परिणामी घाण अाणि कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

कचरा कुंड्या नाहीत
अनेक ठिकाणी प्लास्टिक डस्टबीन व कचरा कुंड्या नसल्याने लोक नाईलाजाने कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचार्यांमार्फत रोज कचरा उचलला जातो परंतू हा कचरा पुन्हा जमा होतो. तर काही सोसायटी व वसाहतीमध्ये कचरा टाकण्यासाठी प्लास्टिकचे ड्रम ठेवण्यात आले आहेत. ते वेळच्या वेळी खाली होत नाहीत.

अपुरे सफाई कर्मचारी
आज घडिला पाली ग्रामपंचायतीकडे अधिकृत १७ ते २० सफाई कर्मचारी आहेत. मात्र तुटपूंजा पगार व सेवासुविधांचा अभाव यामुळे प्रत्यक्षात जेमतेम १०-१२ कर्मचारी काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. सर्वच ठिकाणची साफसफाई करणे त्यांना शक्य होत नाही. 

घंटा गाड्या हव्या
ग्रामपंचायतीकडे सध्या दोन घंटा गाड्या आहेत. यातील एक घंटागाडी बंदिस्त आहे त्यामुळे तिच्यात अधिक कचरा सामावत नाही. तसेच पालीचा विस्तार वाढत असल्याने अधिकच्या घंटा गाड्यांची आवश्यकता आहे.

कोणत्याही खर्चाची तरतूद नसतांना अतिरिक्त सफाई कर्मचारी कामाला लावून साफसफाई सुरु केली आहे. जेथे अधिकचा कचरा आहे तेथे जेसीबी व ट्रॅक्टर लावून सफाई केली जात आहे. काहि दिवसांत घंटा गाडी घराघरासमोर फिरुन हा कचरा गोळा करणार आहे. तसेच नवीन कचरा कुंड्या करण्यात येतील. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे.
गणेश बालके, नवनिर्वाचीत सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पाली. 

नागरिकांनी कुठेही कचरा टाकू नये. शक्यतो ओला व सुका कचरा वेगळा करावा. आपल्या परिसरात स्वच्छता राहील याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी सहाय्य करावे. 
किरण खंडागळे, तरुण, पाली

Web Title: The problem of garbage in pali is serious