आरागिरणी चौकशीत चालढकल होत असल्याचा आरोप

Procrastination In Investigation Of Illegal Saw-Mill Sindhudurg Marathi News
Procrastination In Investigation Of Illegal Saw-Mill Sindhudurg Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - बांदा परिसरात आरागिरणींना अतिरिक्‍त आरायंत्र बसवण्यास बेकायदा परवानगी दिल्याच्या तक्रारीची चौकशी करण्यात येथील उपवनसंरक्षक कार्यालय चालढकल करत असल्याचा आरोप तक्ररदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी पत्रकातून केला आहे. 

त्यांनी दिलेल्या पत्रकातील आशय असा, येथील उपवनरक्षक कार्यालयाने शासनाचे कोणतेही आदेश नसताना बांदा येथील इएसझेड क्षेत्राच्या परिसरात बनावट पंचनामे करून आरागिरणीला अतिरीक्त आरायंत्र बसविण्यास परवानगी दिल्याची तक्रार प्रधान सचिव वने मंत्रालय, मुंबई यांच्याकडे केली होती. या तक्रार अर्जाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी 12 डिसेंबर 2019 ला मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिले.

त्याची प्रत माहितीसाठी संबंधीत कार्यालयांना संदर्भीय शासन पत्राच्या छायाप्रतीसह माहिती व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषीत केलेला आहे. कक्ष अधिकारी कक्ष 215 यांना देखील त्यांच्याशी संबंधीत मुद्यांचे अनुसरून आवश्‍यक कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले. या पत्राची प्रत अर्जदार बरेगार यांना पाठविली. मुख्य वनरक्षक कोल्हापूर यांनी देखील उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना अहवाल पाठविण्याबाबत कळविले.

शासन आदेशानुसार कार्यवाही करून दिलेल्या मुदतीत अहवाल न पाठविल्याने मुख्य वनरक्षक कार्यालयाकडून उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना ईमेलद्वारे कळविण्यात आले; मात्र या कालावधीत सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांची समिती नेमल्याचे उपवनसंरक्षक कार्यालयाने दर्शविले. या समितीने 14 दिवसानंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांची किंवा वरीष्ठांनी केलेल्या कामाची चौकशी कनिष्ठांकडून करणे उचित होणार नाही, असे समितीचे मत असल्याचे कळविले. त्याची प्रत मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना माहितीसाठी पाठविली. याबाबत आपण माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करून माहिती घेतल्याचे बरेगार यांनी नमूद केले आहे. 

अहवाल न गेल्यास कायदेशीर कार्यवाही 
पत्रकात म्हटले आहे कि, या प्रकरणात चालढकल होत असल्याने याबाबत मुख्यवनसंरक्षक यांना कळविले आहे. त्याची प्रत प्रधान सचिव वने, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, वनसंरक्षक नागपूर यांना पाठविली आहे. एका आठवड्यात चौकशी करून वस्तुस्थितीप्रमाणे वरिष्ठांना अहवाल न गेल्यास कायदेशीर सल्ला मिळेल त्याप्रमाणे कार्यवाही करणार असल्याचे श्री. बरेगार यांनी यात नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com