भाजप मंत्र्यांकडून योगेश कदमांचे प्रमोशन

भाजप मंत्र्यांकडून योगेश कदमांचे प्रमोशन

दाभोळ - रामदास कदम व त्यांचे पुत्र योगेश यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाकडे २०१६ पासून लक्ष दिल्याने भाजपच्या मंत्र्यांनी रामदास कदम यांचा मुलगा योगेश याला दापोली मतदारसंघात प्रमोट करण्यासाठी विकासकामे मंजूर करण्याचे धोरण अवलंबिले. दर १५ दिवसांनी कोट्यवधींची विकासकामे रामदास कदम यांच्याकडून दापोलीत प्रसिद्ध होऊ लागली. सत्तेचा लाभ भाजपच्या कार्यकर्त्यांना कधीच मिळाला नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपला अच्छे दिन येतील असे वाटून स्थनिक नेतृत्वाने पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे अनेक विकासकामे सुचविली होती, मात्र ती झाली नाहीत. मध्यंतरीच्या काळात विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी दापोलीत लक्ष घालण्यास सुरवात केली होती. त्यांनी काही विकासकामे मंजूर करून आणली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने अचानकपणे त्यांना दापोलीतून लक्ष काढण्यास सांगितले.  

रामदास कदम यांनी २०१९ च्या निवडणुकीत मात्र गीते यांच्या प्रचाराची दापोली विधानसभा मतदारसंघात जबाबदारी घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करणे कठीण आहे. 

गेली ३० वर्षे खासदार गीते यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जेवढा प्रचार आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला नसेल तेवढा प्रचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला होता. मात्र निवडून आल्यावर गीते यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्कच ठेवला नाही अथवा त्यांना विकासकामांसंदर्भात विचारणा केली नाही.

शशिकांत धाडवेंचा अपेक्षाभंग 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या स्वाभिमानी बहुजन आघाडीचे उमेदवार  शशिकांत धाडवे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार म्हणून जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी जाहीर केले होते, मात्र भाजप-शिवसेना युतीमुळे त्यांचाही अपेक्षाभंग झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com