Maharashtra Budget : कोकणासाठी Good News ; रेवस-रेडी सागरी महामार्गासाठी ९ हजार ५७३ कोटींची तरतूद

Provision of Rs 9573 crore for Revas Ready Marine Highway maharashtra budget kokan marathi news
Provision of Rs 9573 crore for Revas Ready Marine Highway maharashtra budget kokan marathi news

सिंधुदुर्ग : राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये  अनेक पायाभूत सेवांच्या उभारणी संदर्भातील घोषणा केल्या. यामध्ये  कोकणाच्या विकासासाठी  प्रामुख्याने त्यांनी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी महामार्ग बांधणार असल्याची घोषणा केली. हा रस्ता ५४० किलोमीटर लांबीचा असेल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.  यामुळे रेवस-रेडी सागरी मार्गावरील काम पूर्णत्वास येण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. 

काय आहे रेवस-रेडी सागरी महामार्ग

पूर्वी हा मूळ मार्ग सैन्यांच्या वापरासाठी केला जात होता.साधारणता किनारपट्टीवरून रणगाडे घेऊन जाण्यासाठी या मार्गाचा वापर होत असे. काही कालांतराने जल वाहतूक बंद पडली आणि हा मार्ग समुद्रकिनार्‍यापासून दूर गेला. त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा विकास खुंटत गेला. पुढे जाऊन सागरी महामार्गाची कन्सेप्ट पुन्हा एकदा समोर आली. यामध्ये पत्रकारांनी मोठा सहभाग घेतला. यासाठी सकाळचे संपादक माधव गडकरी यांनी विशेष प्रयत्न केले.आणि वीस-एक वर्षांपूर्वी ही मोहीम सुरु करण्यात आली.

  रेवस (जि. रायगड) ते रेडी (जि. सिंधुदुर्ग)  पर्यंत रस्ते आणि छोटी छोटी फुले एकमेकांना जोडण्यासाठी वेगवेगळी पुल मंजूर झाले , रस्त्यांचे रुंदीकरण झाले,अन् काम सुरू झाले मात्र आर्थिक तरतूदमुळे ती कन्सेप्ट पूर्णत्वाला गेली नाही आजच्या अर्थसंकल्पीय  मंजूर झालेल्या बजेटमुळे सागरी महामार्ग  मार्गावरील काम पूर्णत्वास येण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल असं म्हणता येईल

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com