सुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

अमित गवळे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पाली - सुधागड तालुका शिवसेनेच्या वतीने येथील भक्त निवास क्रं. १ मध्ये आदिवासी बांधवांचा जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील अनेक आदिवासी समाज बांधवांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी भर सभेत एका आदिवासी महिलेने खंबिरपणे उभे राहुन चक्क अनंत गिते यांना परखड प्रश्न विचारले.

आदिवासी बांधवांना त्यांचे मुलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी शिवसेना कायम प्रयत्नशिल राहिल. आदिवासींना वनहक्क मिळवून देण्यासह आदिवासींच्या उत्कर्षासाठी कायम कटिबध्द राहणार असल्याची शाश्वती गिते यांनी दिली. आदिवासी समाजमंदीर उभारण्यासाठी खासदार निधीतून १० लाखांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. या बरोबरच विविध कामाकरीता खासदार निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्द करुन देणार असल्याचे गिते म्हणाले.

आदिवासीबांधवांचे प्रश्न व समस्या सोडविण्यास शिवसेना कायम कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही जिल्हाप्रमुख देसाई यांनी दिली. आदीवासी समाजमंदीर आदिवासी कातकरी समाजाचे शैक्षणिक, समाजिक व धार्मीक उपक्रमांचे केंद्र बनेल असा विश्वास अनुपम कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, जि.प. सदस्य किशोर जैन व रविंद्र देशमुख, महिला संपर्क प्रमुख किशोरी पेडणेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, अनुपम कुलकर्णी,संघटक सुधीर ठाणे, पं.स सदस्य नंदू सुतार, किशोर दिघे, उपतालुकाप्रमुख सचिन जवके, वर्षा सुरावकर, सोनल मढवी, रमेश मुल्ल्या आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

मेळाव्यात सोसायटी वाडीच्या एका आदिवासी महिलेने भर सभेत रस्ते, पाणी व विज आदी समस्या जाहीरपणे मांडल्या. अाणि गिते यांच्या भाषणात काही वेळ हि महिला अापले प्रश्न उपस्थित करत होती. या समस्या कधी मार्गी लागणार याचा जाब देखिल तिने विचारला. यावर आदिवासींच्या प्रश्न समस्या सोडविण्यासाठी येत्या काळात भरिव निधी उपलब्द करुन देणार असल्याचे गिते यांनी सांगितले.

Web Title: Public Admission to many tribal brothers in Sudhagad taluka, Shivsena