सुधागड तालुक्यातील सार्वजनिक अारोग्य सेवा ढासळली

अमित गवळे 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पाली : अादीवासी बहुल असेल्या सुधागड तालुक्यातील अारोग्य सेवा पुर्णपणे ढासळली आहे. वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा यामूळे येथील विदयार्थी व नागरीकांचे अारोग्य वाऱ्यावर अाले आहे.

रिक्त पदे
सुधागड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र पाली व प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा ही दोन आरोग्यकेंद्र असून याअंतर्गत 14 उपकेंद्र आहेत. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास 43810 लोक अवलंबून आहेत. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर 28861इतके लोक अवलंबून आहेत. 

पाली : अादीवासी बहुल असेल्या सुधागड तालुक्यातील अारोग्य सेवा पुर्णपणे ढासळली आहे. वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा यामूळे येथील विदयार्थी व नागरीकांचे अारोग्य वाऱ्यावर अाले आहे.

रिक्त पदे
सुधागड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र पाली व प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा ही दोन आरोग्यकेंद्र असून याअंतर्गत 14 उपकेंद्र आहेत. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास 43810 लोक अवलंबून आहेत. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर 28861इतके लोक अवलंबून आहेत. 

लोकसंख्येच्या तुलनेत येथे एकूण 4 पुर्णवेळ वैद्यकीय अधिकार्‍यांची आवश्यकता आहे. परंतू याठिकाणी केवळ 1 पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी सेवेत अाहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नाडसूर, नांदगाव, उध्दर,आपटवणे, नेणवली, राबगाव, सिध्देश्वर अशी एकूण 7 उपकेंद्रांचा समावेष आहे. यापैकी नाडसूर उपकेंद्रात आरोग्य सेवक पुरुष 1 पद रिक्त आहे. 

आपटवणे उपकेंद्रात आरोग्य सेवक पुरुष 1 पद रिक्त,नाडसूर उपकेंद्रात आरोगय सेवक महिला 1 पद रिक्त, उध्दर उपकेंद्रात आरोग्य सेवक महिला 1 पद रिक्त, राबगाव उपकेंद्रात आरोग्य सेवक महिला 1 पद रिक्त, सिध्देश्वर उपकेंद्रात आरोग्य सेवक महिला 1 पद रिक्त आहे. तर अर्धवेळ स्त्री परिचर उध्दर उपकेंद्रात 1पद रिक्त आहे. अशाप्रकारे उपकेंद्राच्या इमारती मात्र सुसज्य आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र. जांभुळपाडा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रात वावे तर्फे आसरे, हातोंड, नवघर, महागाव, पेडली, परळी, दहिगाव अशा सात उपकेंद्राचा समावेष आहे. येथील पेडली उपकेंद्रात आरोग्य सेवक पुरुष 1 पद रिक्त, तसेच परळी उपकेंद्रात आरोग्य सेवक पुरुष1 पद रिक्त आहे.

अादीवासी विदयार्थ्यांचे अारोग्य धोक्यात

 सुधागड तालुक्यात वावळोली आदिवासी आश्रमशाळेसह चिवे व पडसरे आदिवासी आश्रमशाळा अाहेत. वावळोली येथे एकूण 751विद्यार्थी, चिवे येथे 600 विद्यार्थी तर पडसरे येथे 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची पाली व जांभुळपाडा प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत आरोग्यतपासणी केली जाते.

आरोग्यतपासणी दरम्यानसर्दी, ताप, खोकला, अंगदुखी व डोकेदुखीसाठी आवश्यक असलेली पॅरासेटोमोल या गोळीसह जुलाब,उलटी,पोटदुखी,खरुज व जखमेसाठी आवश्यक असलेली औषधे,गोळ्या व मलमे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून उपलब्द होत नाहीत. त्यामुळे आरोग्य सेविका व आरोग्य सेवेकांपुढे मोठी समस्या निर्माण होत आहे. 

आरोग्यतपासणीदरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला अथवा नागरिकाला आजाराची लागण झाल्यास रुग्नाला औषधे व गोळ्या कुठून द्यायच्या असा प्रश्न आरोग्य विभागातील कर्मचार्यांना सतावत आहे. याबरोबरोच येथील आदिवासी आश्रमशाळेत आरोग्य तपासणीकरीता फिरते वैद्यकिय पथक होते. परंतू डॉक्टरअभावी हे पथक देखील उपलब्द होत नसल्याने विद्यार्थ्यांची अचानकपणे तब्येत खालावल्यास शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे वावळोली आश्रमशाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विष्णु कुंभार यांनी सकाळला सांगितले. 

तर वावळोली आदिवासी आश्रमशाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जयवंत गुरव यांनी आदिवासी आश्रमशाळेतील वसतीगृहात विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे परंतू जि.प आरोग्यविभागाकडून औषध पुरवठा होत नसल्याने खाजगी मेडीकलमधून औषधे गोळ्या आणून विद्यार्थ्यांवर उपचार केले जात असल्याची माहिती दिली.

सदर रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषतदेकडे प्रत्येक महिन्याला रिक्त पदांच्या आकडेवारीचा अहवाल सादर केला जातो. येथील रिक्त पदे भरल्यास आरोग्य सेवेचे कामकाज अधिक गतीने होईल.
- डाॅ. रुस्तम दामले, वैद्यकीय अधिकारी, पाली-सुधागड

 

Web Title: Public health service in Sudhagad taluka has been suspended