चव्हाण प्रकरणात संवेदनशीलता दाखवा ः तावडे

puja chavan suicide issue vinod tawde statement
puja chavan suicide issue vinod tawde statement

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होतात. त्यावेळी राजकीय नेतृत्वाने संवेदनशीलता दाखवित निर्णय घेणे आवश्‍यक असतो. त्यामुळे पुजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई करीत राजकीय संवेदनशीलता दाखवावी, असे मत भाजप नेते विनोद तावडे यांनी येथे व्यक्त केले. 

जिल्हा दौऱ्यावर आलेले श्री. तावडे यांचे येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अतुल काळसेकर, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, राजा राणे, बाळा हरयाण, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते. 

तावडे म्हणाले, ""पुजा चव्हाण प्रकरणात कारवाई व्हावी, अशी अपेक्षा राज्यातील जनतेला आहे. राजकीय नेतृत्व संवेदनशील असेल तर नक्कीच कारवाई होईल. पेट्रोल, डिझेलचे दर जगात वाढत आहे. त्यामुळे आपल्या देशात देखील वाढले आहेत; परंतु जे विरोधक राज्यात पेट्रोल डिझेलचा कांगावा करीत आहेत. त्यांनी आजुबाजुच्या राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत हे पाहावे. त्या राज्यांतील सरकारांना जमते ते महाराष्ट्रातील सरकारला काम जमत नाही याचे आत्मपरीक्षण करावे त्यांनतरच टीका करावी.'' 

1 मार्चपासुन सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे कोरोनाची संख्या वाढवुन सांगितली जात आहे. हा राजकीय कोरोना आहे, अशी टीका भाजपच्या नेत्यांकडुन केली जात आहे. यासंदर्भात श्री. तावडेंना विचारले असता ते म्हणाले, ""समाजातील सर्व व्यवस्था आता सुरू झाली आहे. कोरोनामुळे आता काहीही थांबलेले नाही. त्यामुळे केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्यासाठी कोरोनाचा वापर होऊ नये, असे आमचे मत आहे. राज्यातील अनेक प्रश्नावर या अधिवेशनात चर्चा व्हायला हवी. अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या सर्व आमदारांना कोरोना टेस्ट करून प्रवेश दिला जातो. आवश्‍यक ती खबरदारी घेवुन राज्य सरकारने पूर्ण वेळ अर्थसंकल्पशीय अधिवेशन घ्यावे. कोणतीही पळवाट काढु नये हीच आमची मागणी आहे.'' 

मुंबईत एका ठिकाणी सापडलेल्या स्फोटकाविषयी ते म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर काही भाष्य करता येणार नाही; परंतु दहशतवादाशी कुणीही एक सरकार लढत नाही तर आपण सर्वांनी एकत्रित लढायचे असते. त्यामुळे या विषयात राजकीय टीका होता कामा नये.'' 

पैकीच्या पैकी पाहिजेत 
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील नगरसेवकांनी जरी अन्य पक्षात प्रवेश केला असला तरी आपल्याला या नगरपंचायतीत पैकीच्या पैकी नगरसेवक पाहिजेत. त्यासाठी जोरदार प्रयत्न करा, बुथनिहाय काम करा, अशी सूचना त्यांनी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना केली. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com