आंबेनळी अपघातातील बस काढली बाहेर

आंबेनळी अपघातातील बस काढली बाहेर

आंबेनळी : जुलै महिन्याच्या 30 तारखेला पोलादपुर नजीक आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात झाला होता. या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या बसची दुरावस्था पाहून अपघाताच्या तिव्रतेची कल्पना येऊ शकेल.

कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन चाललेही असलेली हि बस दरीत कोसळून 30 कर्मचाऱ्यांना आपले जिव गमवावे लागले होते. या दुर्दैवी घटनेनंतर संपुर्ण राज्यभर शोककळा पसरली होती. अपघातानंतर या प्रकरणी अनेक वादंग उठले. या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव व्यक्ती बचावली होती. यानंतर त्यांच्यावरही बरेच आरोप करण्यात आले. त्या नंतर या अपघात प्रकरणी चौकशीचा रेटा वाढत चालला होता. याच धरतीवर कृषी विद्यापिठाने हि अपघातग्रस्त बस बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

- पाच तासांच्या प्रयत्नांना यश

- उध्वस्त झालेल्या बसच्या सांगाड्यामुळे अपघाताच्या आठवणी ताज्या

- आरटीओ आणि फॉरेन्सीक विभागाकडुन बसची पहाणी

- संध्याकाळी उशीरा अपघातग्रस्त बस दापोली कृषी विद्यापिठाच्या ताब्यात

शनिवारी सकाळी हि बस काढण्याचे काम सुरू झाले. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि दुभाश क्रेन सर्व्हीसेस च्या एकत्रीत प्रयत्नांनतर दुपरी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बस बाहेर काढण्यात आली. रायगड आरटीओ, फॉरेन्सीक विभागाने बसची पहाणी केली. मृतांचे नातेवाईक देखिल या बसचे निरखुन तपासणी करीत होते. बसचे फोटो घेत असताना पुन्हा एकदा त्या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com