पूर्णगडमध्ये समुद्राचे पाणी प्रथमच रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पावस - पावस पंचक्रोशीत वादळी पावसाने धुमाकूळ घातला असून नाखरे येथे घरावर झाड कोसळले असून कुर्धे येथे विद्युत खांब कोसळल्याने पंचवीस ते तीस घरे अंधारात आहेत. पावस समाधी मंदिर मार्गावर झाड कोसळल्याने ठप्प झालेला वीज पुरवठा 72 तासानंतरही सुरळीत झालेला नाही.

पावस - पावस पंचक्रोशीत वादळी पावसाने धुमाकूळ घातला असून नाखरे येथे घरावर झाड कोसळले असून कुर्धे येथे विद्युत खांब कोसळल्याने पंचवीस ते तीस घरे अंधारात आहेत. पावस समाधी मंदिर मार्गावर झाड कोसळल्याने ठप्प झालेला वीज पुरवठा 72 तासानंतरही सुरळीत झालेला नाही.

दरम्यान, पूर्णगड येथे समुद्राच्या उधाणाचे पाणी लोकवस्तीत घुसले आहे. उधाणाचे पाणी प्रथमच रस्त्यावर आल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावस पंचक्रोशीत पडणार्‍या पावसाने अनेक गावांमध्ये विद्युत खांब पडल्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी हैराण झाले आहेत. 2 ऑगस्टला पावस समाधी मंदिर मार्गावर विजेच्या तारांवर आंब्याचे झाड पडल्याने खांब कोसळला. 

हा खांब अद्याप बदलण्यात आला नसून 72 तासानंतरही येथील ग्राहक अंधारात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
कुर्धे येथे रात्री दोनच्या सुमारास महाविष्णू मंदिर परिसरातील विद्युत खांब कोसळल्याने पंचवीस ते तीस घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच नाखरे रामेश्वरवाडी येथील दीपक शांताराम गुरव याच्या घरावर झाड कोसळल्याने सुमारे चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नाखरे कालकरकोंड येथे रात्री वस्तीला असणारी धांबडमार्गे नाखरे ते रत्नागिरी एसटी (एमएच-20-9768) सकाळी सहा वाजता सुटण्यासाठी जिल्हा परिषद शाळेजवळ निघाली होती. त्यावेळी चालकाने गाडी वळवत असताना ब्रेक निकामी झाल्याने गाडी उतारावर एका झाडावर जाऊन आदळली. त्यात एसटीचे नुकसान झाले असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Purnagad, sea water for the first time on Road