जमिनीच्या वादातून कारिवडेत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

सावंतवाडी - जमिनीच्या वादातून कारिवडेत दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरुद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली.

सावंतवाडी - जमिनीच्या वादातून कारिवडेत दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरुद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली.

याप्रकरणी येथील पोलिसांत अश्‍विनी अनिल कोलगावकर, प्रणिता कोलगावकर या जखमी झाल्या आहेत. यात प्रणिता हिचा हात फॅक्‍चर झाला असून, अश्‍विनी यांचे मंगळसूत्र आणि मोबाईल चोरीस गेला आहे. जमीन जागेच्या वादातून कारिवडे गावठणवाडी येथे दोन गटात दांड्याने जोरदार हाणामारी झाली. यात दोन महिला जखमी झाल्या आहेत. 

हा प्रकार आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. कोलगावकर कुटुंबीय आणि आपल्या घराशेजारील माती आपल्याच कंपनीच्या बाजूला जेसीबीने टाकत असताना कारिवडेकर कुटुंबीयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ही हाणामारी झाली.

कारिवडे गावठाणवाडी येथे लता बाबी कोलगावकर हिच्या मालकीची जमीन असून, या जमिनीशेजारी महादेव कृष्णा कारिवडेकर यांची जमीन लागून आहे. आपल्या जमिनीच्या बाजूने खड्डा खोदून त्याठिकाणी दोघी कोलगावकर महिला माती टाकत असताना महेश महादेव कारिवडेकर, रवी कारिवडेकर, आनंद बाबाजी कारिवडेकर, मिलन महेश कारिवडेकर, समिती महादेव कारिवडेकर यांनी प्रणिता कोलगावकर, अनिल कोलगावकर व अश्‍विनी कोलगावकर यांच्यावर दांड्याने हल्ला केला. यात प्रणिता व अश्‍विनी यांना दुखापत झाली असून, पर्यायी त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

जमाव करून मारल्याचा आरोप
संबंधित जखमी महिलांनी आपल्याला चार ते पाच पुरुषांनी जमाव करून  मारहाण केल्याचा आरोप  केला आहे. या जखमीमध्ये आई व विवाहित मुलगी यांचा समावेश आहे. कारिवडेकर कुटुंबीयांनी आपल्या घरात आपणास येऊन मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quarrel in Karivade on land dispute