राबगाव ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांचा शे.का.पमध्ये जाहीर प्रवेश

अमित गवळे
गुरुवार, 10 मे 2018

पाली - सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या कविता वाळंज व सदस्य केशव वाळंज यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत नुकताच शेतकरी कामगार पक्षात जाहिर प्रवेश केला.

प्रवेशकर्त्यांचे शे.का.प नेते व जि.प सदस्य सुरेश खैरे यांनी स्वागत केले. प्रवेशकर्त्यांमध्ये सुरेश वाळंज, नरेश वाळंज, सचिन द. वाळंज, वामन वाळंज, नागेश वाळंज, येसुराम वाळंज आदिंचा समावेश आहे. राबगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांचा हा प्रवेश शे.का.पच्या राजकीय वाटचालीस लाभदायक ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

अनेक वर्षापासून राबगाव ग्रामपंचायतीत सुरेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असल्याचे वाळंज यांनी सांगितले.  जनतेचे प्रश्न सोडवून गावाच्या समृध्दीसह गावाचा विकास घडवून आणण्याची धमक शे.का.पक्षातच असल्याचे यावेळी ते म्हणाले. तर शे.का.प नेते सुरेश खैरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, आमदार धैर्यशिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासन योजनांबरोबरच जि.प व पंचायत समितीच्या माध्यमातून राबगावाचा सर्वांगिण व शास्वत विकास घडवून आणण्यासाठी कटिबध्द आहोत. 

यावेळी शे.का.पक्षाचे ज्येष्ठ नेते बाजीराव भोईर,महादेव भोईर, महादेव दा. भोईर, माजी सरपंच विमल भोईर,पांडुरंग संतोष शिवराम भोईर, विलास भोईर, संदेश भोईर,सचिन भोईर, निलेश सुदाम भोईर, प्रकाश भोईर, दिलीप भोईर, पांडुरंग भोईर, तुकाराम भोईर, विष्णू भोईर आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्त उपस्थीत होते.

Web Title: rabgaon grampanchayat members is in shetkari kamgar paksh